मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठाचे पौष्टीक लाडू(16)

Photo of LADU by Manjiri Hasabnis at BetterButter
834
1
0.0(0)
0

मिक्स पिठाचे पौष्टीक लाडू(16)

Sep-14-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठाचे पौष्टीक लाडू(16) कृती बद्दल

हे लाडू घरात असलेल्या पीठांपासून बनवता येतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 4 वाट्या बेसन
  2. 1 वाटी कणिक
  3. 1 वाटी बारीक 0 नंबर रवा
  4. 1 वाटी तांदळाचे पीठ
  5. 3 वाट्या पिठी साखर
  6. दिड ते 2 वाट्या साजूक तूप
  7. अर्धी वाटी दूध
  8. बदाम,काजू,मगज बी यांची जाडसर भरड
  9. 1 चमचा vanila इसेन्स

सूचना

  1. प्रथम अर्धी ते पाऊण वाटी तूप एका कढईत घेऊन गॅस वर ठेवावे प्रथम बेसन भाजून घ्यावे त्याचा थोडा भाजल्याचा खमंग वास यायला लागला की रवा घालावा ब भाजावा रव्या च खमंग वास यायला लागला की गव्हाचे पीठ ,(कणिक) घालावी ती थोडी भाजत आली की शेवटी तांदळाचे पीठ घालावे आणि मंद गॅस वर भाजावे मध्ये मध्ये प्रत्येक पिठाला 1 ते 2 चमचे तूप कढईत घालत राहावे सगळी पीठे छान खमंग भाजून झाली घरभर मस्त वास सुटला की त्यात ड्राय फ्रुटस ची भरड घालावी आणि अर्धी वाटी दुधाचा हबका मारावा पिठावर आणि हलवावे छान दाणेदार होते मिश्रण आणि रवा मस्त फुलून येतो गॅस बंद करावा इसेन्स घालून पुन्हा परतावे मिश्रण कोमट करायला ठेवावे कोमट झाले की त्यात पिठी साखर घालून हाताने एकजीव करावे आणि आपल्या आवडी प्रमाणे लाडू वळायला घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर