मुख्यपृष्ठ / पाककृती / मिठाचे वांगे

Photo of GREEN Brinjal by SUCHITA WADEKAR at BetterButter
178
1
0.0(0)
0

मिठाचे वांगे

Sep-14-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिठाचे वांगे कृती बद्दल

हि रेसिपी माझी आजी बनवायची. आम्हा मुलांच्या खूप आवडीची. कधी कधी तोंडाला चव नसेल किंवा कुठलीच भाजी खावीशी वाटत नाही अशावेळी मिठाचे वांगे बनवावे जेवण जरा जास्तच जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वांगी पावकिलो
  2. लसूण 5-6 पाकळ्या
  3. खोबरे 4 चमचे
  4. कोथिंबीर
  5. हिरवी मिरची 5-6
  6. दाण्याचा कूट अर्धी वाटी
  7. मीठ आवश्यकतेनुसार
  8. तेल

सूचना

  1. प्रथम वांग्यांना उभा आडवा काप देऊन चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावीत.
  2. लसूण, खोबरे, मिरचीचे वाटण करून घ्यावे.
  3. एका ताटामध्ये लसूण, खोबरे, मिरचीचे वाटण, दाण्याचा कूट, मीठ, कोथिंबीर आणि एक चमचा तेल घालून मिक्स करावे.
  4. हे तयार झालेले सारण वांग्यामध्ये भरावे.
  5. नंतर गॅसवर एका छोट्या कुकर मध्ये तेल घालावे. तेल तापल्यावर हिंग, हळद घालून मसाला भरलेली वांगी ठेऊन द्यावीत.
  6. यात थोडे पाणी घालावे आणि कुकरचे झाकण लावून एक शिट्टी होऊ द्यावी.
  7. एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा आणि पाच मिनिटांनी बंद करावा.
  8. आपले मिठाचे वांगे तैयार. पोळी भाजरी सोबत सर्व्ह करावे "मिठाचे वांगे".

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर