दाल फ्राय तडका | DALFRY tadaka Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  15th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of DALFRY tadaka by Samiksha Mahadik at BetterButter
दाल फ्राय तडकाby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About DALFRY tadaka Recipe in Marathi

दाल फ्राय तडका recipe

दाल फ्राय तडका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DALFRY tadaka Recipe in Marathi )

 • 1 वाटी तूरडाळ
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • 1 टोमॅटो बारीक चिरलेला
 • आलं लसूण पेस्ट
 • कोथिंबीर
 • हळद
 • तिखट
 • मीठ
 • धनेजिरे पूड
 • साजुक तूप
 • लाल सुक्या मिरच्या 3

दाल फ्राय तडका | How to make DALFRY tadaka Recipe in Marathi

 1. प्रथम तूरडाळ धुवून 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा मग कुकरमध्ये हळद व मीठ घालून शिजवून घ्या
 2. मग एका पातेल्यात साजुक तूप गरम करून त्यात हिंग व जिरे घाला व परतून घ्या मग त्यात लाल सुक्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे 2 मिनिटे मग त्यात कांदा घालून 5 मिनिटे परतावे कांदा गुलाबीसर झाल पाहिजे
 3. मग त्यात हळद, तिखट, धानेजिरे पूड घालून परतावे
 4. मग त्यात टोमॅटो व कोथींबीर घालून छान तूप सुटेपर्यंत परतून घ्या
 5. मग त्यात शिजलेली डाळ घाला
 6. डाळीला उकळी येऊ द्या तोपर्यंत तडका देण्यासाठी दुसऱ्या भांड्यात साजुक तूप गरम करा मग त्यात जिरे घाला व परता मग त्यात अर्धा चमचा तिखट व कोथिंबीर घालून परता व गॅस बंद करा
 7. हा तडका डाळीवर घाला व एक उकळी काढून गॅस बंद करा
 8. बाऊलमध्ये काढून कोथिंबीर व साजुक तूप घालून गरम गरम जीरा राईस किंवा प्लेन राईस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

साजुक तूप ऐवजी बटर सुद्धा वापरू शकता

Reviews for DALFRY tadaka Recipe in Marathi (0)