मुख्यपृष्ठ / पाककृती / माणिक मोती(आंबा डाळ)

Photo of MANIK moti by Aditi Bhave at BetterButter
1091
1
0.0(0)
0

माणिक मोती(आंबा डाळ)

Sep-16-2018
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

माणिक मोती(आंबा डाळ) कृती बद्दल

आंबा डाळ पण थोडं हटके version , टेस्ट तीच पण थोडा innovative प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. हरभरा डाळ- 1 वाटी
  2. साबुदाणा- अर्धी वाटी
  3. खोबरं - पाव वाटी
  4. कोथींबीर - पाव वाटी
  5. किसलेली कैरी - पाव वाटी
  6. मिरच्या-3 ,4
  7. साखर- 2 चमचे
  8. मीठ- चवीनुसार
  9. हिंग, हळद , मोहरी, तेल फोडणीसाठी

सूचना

  1. साबुदाणा भिजवून ठेवावा.
  2. चणा डाळ 2 तास भिजत ठेवावी .
  3. कैरी किसून घ्यावी.
  4. डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
  5. मिरची वाटून घ्यावी.
  6. वाटलेली डाळ, साबुदाणा, किसलेली कैरी ,वाटलेली मिरची, मीठ, साखर, खोबरे, कोथिंबीर सगळे एकत्र करून घ्यावे.
  7. फोडणी करून घ्यावी. थोडा हिंग जास्त घालावा.
  8. फोडणी गार झाल्यावर ती या मिश्रणात घालावी.
  9. सर्व मिश्रण एकत्र करावे.
  10. माणिक मोती , म्हणजेच आंबा डाळ तयार आहे.
  11. एरवी आपण साबुदाणा घालत नाही, मी यात साबुदाणा घातला आहे, म्हणून माणिक मोती असे नाव दिले आहे.
  12. टेस्ट खूप छान लागते. पारंपरिक डाळी सारखीच फक्त मध्ये साबुदाणा दाताखाली आला की छान वाटतं.
  13. Season मध्ये मी कच्या कैरीचा किस करून फ्रीझर मध्ये air tight डब्ब्यात बंद करून ठेवते. जेव्हा लागेल तसा मग use करता येतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर