मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे मोमोज

Photo of Purnache momos by Aarti Nijapkar at BetterButter
768
1
0.0(0)
0

पुरणाचे मोमोज

Sep-16-2018
Aarti Nijapkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे मोमोज कृती बद्दल

पुरणाचे मोमोज नेहमीप्रमाणे पुरण करून तांदळाची उकड किंवा पीठ मळून त्यात पुरण भरून मोमोज चा आकार द्या जमेल तसं मग वाफवून घ्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • अमेरीकन
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चण्याची डाळ १ वाटी
  2. गूळ १ वाटी
  3. सुंठ पावडर १/४ लहान चमचा
  4. तूप १ मोठा चमचा
  5. काजू कापलेले १ लहान चमचा
  6. बादाम कापलेले १ लहान चमचा
  7. चारोळी १ लहान चमचा
  8. आवरणसाठी
  9. मैदा १ वाटी
  10. मीठ किंचित
  11. तेल लहान चमचा
  12. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. प्रथम चना डाळ धुवून घ्या
  2. एक भांड्यात चण्याची डाळ आवश्यकतेनुसार पाणी घालून चण्याची डाळ शिजवून घ्यावी
  3. चण्याची डाळ शिजली की त्यातलं पाणी सुकवून टाका
  4. उरलेलं पाणी सुकले की गॅस मंद करून त्यात किसलेलं किंवा कापलेले गूळ व सुंठ पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  5. मिश्रण सतत परतावेत जेणेकरून मिश्रण एकत्र होईल व सुटलेलं पाणी सुकून जाईल
  6. गूळ व चण्याची डाळ एकजीव झाले की गॅस बंद करून पुरण थोडे कोमट करून पुरण यंत्र किंवा पाट्यावर वाटून घ्या
  7. मिक्सर मध्ये वाटत असाल तर पुरण गार करून घ्यावे
  8. आता एका भांड्यात किंवा पॅन मध्ये तूप गरम करून त्यात कापलेले काजू , बदाम ,चारोळी परतवून घ्या मग त्यात वाटलेले पुरण घालून एकजीव करून घ्या व गॅस करून घ्या
  9. मोमोज चे आवरण
  10. मैद्यात तेल व मीठ घालून एकत्र करून घ्या मग त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या
  11. पीठ ८ ते १० मिनिटे झाकून ठेवा
  12. आता लहान गोळे करून लाटून घ्या
  13. ३ इंच किंवा आवडीनुसार लाटावी
  14. मध्यभागी पुरण भरावे व मोमोज च्या आकारात वळून घ्या
  15. अश्याप्रकारे सर्व मोमोज तयार करून घ्या
  16. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे त्यावर चाळणी ठेवावे (चाळणीला तेल लावणे आवश्यक)
  17. वळलेले मोदक चाळणीत ठेवून वाफवून घ्या ८ ते १० मिनिटे
  18. तयार झालेले गरमागरम मोमोज वर मधाची किंवा तुपाची धार सोडून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर