मुख्यपृष्ठ / पाककृती / झुणका भाकर फ्रेंकी रोल्स

Photo of Jhunka Bhakar Frankie Rolls by Renu Chandratre at BetterButter
1214
4
0.0(0)
0

झुणका भाकर फ्रेंकी रोल्स

Sep-16-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुणका भाकर फ्रेंकी रोल्स कृती बद्दल

आपली मराठमोळी झुणका भाकर नव्या इंडो वेस्टर्न अवतार मधे , मिनी भाकरी करून , सुकी चटणी आणि झुणकाची स्टफिंग करून फ्रेंकी रोल्स तयार केले आहेत , झटपट हातात घेऊन खाता येतात। हेल्थ पण आणि टेस्ट पण

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारी च पीठ 2 वाटी
  2. पातीचा कांदा बारीक चिरून 3-4 वाटी
  3. तेल 2-3 मोठे चमचे
  4. बेसन 1 वाटी
  5. मोहरी 1 चमचा
  6. हळद 1/2 चमचा
  7. लाल तिखट 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. लसणाची चटणी गरजेनुसार
  10. गोड तेल 1-2 चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, लाल तिखट आणि हळद घाला
  2. बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे । आणि झाकून शिजवा
  3. 5 मिनिटे झाले की बेसन घाला
  4. मिक्स करावे आणि 5 मिनीटे झाकून शिजवा । झुणका तयार आहे ।
  5. एका पारातीत ज्वारीचं पीठ , चवीनुसार मीठ घालून , गरम पाणी घालून , मऊसर पीठ तयार करावे।
  6. कोरडं पीठ लावून , लहान लहान भाकरी तयार करा । गरम तव्यावर टाकून ,भाकरीवर पाण्याचा हात फेर
  7. दोनी बाजूने भाजून झाले की आंचेवर शेकून घ्या
  8. दोनी बाजूनी खरपूस भाजून घ्यावे
  9. भाकरी वर गोडे तेल लावावे , वर लसणाची सुकी चटणी लावा । नंतर त्यावर झुणका मधोमध ठेवावा
  10. भाकर रोल करावी आणि टूथपिक नी बंद करावे
  11. पातीच्या हिरव्या पानाने बांधावी / किंवा सजवून सर्व्ह करावे
  12. सोबत , सुकी चटणी, उसळ व झुणका देखील सर्व्ह करु शकता
  13. मजा घ्या इंडो वेस्टर्न झुणका भाकर फ्रेंकी रोल्स चा । हेल्थ पण आणि टेस्ट पण

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर