मुख्यपृष्ठ / पाककृती / साखरभात / केशरीभात

Photo of SWEET SAFFRON RICE by Sanika SN at BetterButter
819
3
0.0(0)
0

साखरभात / केशरीभात

Sep-17-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखरभात / केशरीभात कृती बद्दल

पारंपारिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी बासमती तांदूळ ( स्वच्छ धुवून , निथळत ठेवावे)
  2. १/२ वाटीपेक्षा थोडीच जास्त साखर
  3. ३-४ लवंगा
  4. १ टीस्पून केशर ( हलकेच भाजून घेणे )
  5. १ टीस्पून वेलचीपूड
  6. तूप
  7. काजू, बदामाचे काप, बेदाणे

सूचना

  1. साहित्य
  2. पॅनमध्ये तूप गरम करून काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवणे.
  3. आता त्याच पॅनमध्ये लंवगा घालून, निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतणे.
  4. परतलेल्या तांदळात २ वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.(मी मायक्रोवेव्हमध्ये शिजवला आहे)
  5. शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्यावा.
  6. पॅनमध्ये साखर व पाव वाटीपेक्षा थोडे कमी पाणी घालून एकत्र करा.
  7. त्यात भाजलेले केशर घाला व गोळीबंद पाक करावा.
  8. पाक खूप पातळ राहता काम नये नाहीतर भात मिसळताच तो पांचट होईल.
  9. पाक चिकट झाला की त्यात गार केलेला भात घालून एकत्र करा.
  10. त्यात तळलेले काजू, बदामाचे काप व बेदाणे घालावेत व झाकून मंद गॅसवर एक - दोन वाफा काढाव्यात.
  11. वरुन थोडे साजूक तूप सोडावे.
  12. थोडा गार झाला की वेलचीपूड घालावी.
  13. हा भात आदल्या दिवशी करुन ठेवावा म्हणजे छान मुरतो व चवीला ही छान लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर