मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो फिरनी

Photo of Mango Phirni by Sanika SN at BetterButter
615
4
0.0(0)
0

मँगो फिरनी

Sep-18-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो फिरनी कृती बद्दल

आमरसाच्या स्वादाची चविष्ट फिरनी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ वाट्या दूध
  2. ४ टीस्पून बासमती तांदूळ २ तास भिजवून त्याची मिक्सरवर भरडसर पेस्ट करून घेणे
  3. एका हापूस आंब्याचा दाट रस (साधारण ४-५ टेस्पून पुरेल)
  4. १/४ वाटी साखर
  5. १ टीस्पून बदामाचे काप
  6. १ टीस्पून पिस्त्याचे काप 
  7. १ टीस्पून वेलचीपूड
  8.  १/४ टीस्पून केशर
  9. खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

सूचना

  1. साहित्य
  2. दुध उकळायला ठेवावे.
  3. दुधाला उकळी आली की त्यात भरडसर वाटलेली तांदळाची पेस्ट घालावी.
  4. मध्यम आचेवर सतत ढवळावे, तांदूळ शिजेपर्यंत ढवळत रहावे.
  5. दुध हळू-हळू दाट होऊ लागेल.
  6. त्यात बदाम-पिस्त्याचे काप, केशर व साखर घालून ढवळावे.
  7. शेवटी वेलचीपूड घालून गॅस बंद करावा.
  8. तयार फिरनी एका बाऊलमध्ये काढून ती रुम टेंपरेचरला थंड होऊ द्यावी.
  9. आता त्यात आंब्याचा रस घालून चांगले एकत्र करावे.
  10. फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावी. 
  11. सर्व्ह करताना मातीच्या बाऊलमध्ये करावी.
  12. त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पेरावे, केशर घालावे. 
  13. वरून चांदीचा वर्ख लावावा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर