मुख्यपृष्ठ / पाककृती / नेईअप्पम

Photo of NEIAPPAM by Sanika SN at BetterButter
0
6
0(0)
0

नेईअप्पम

Sep-18-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नेईअप्पम कृती बद्दल

दक्षिण भारतीय पध्दतीचे गोडाचे आप्पे, नेई म्हणजे तूप... तुपात तळलेले गोड आप्पे.

रेसपी टैग

 • सोपी
 • फेस्टिव
 • साऊथ इंडियन
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. वाटी तांदूळ ३-४ तास भिजवणे (उकडा तांदूळ ही चालेल)
 2. ३/४ वाटी चिरलेला गुळ
 3. ३/४ वाटी खवलेला ओला नारळ किंवा नारळाचे काप / तुकडे
 4. १ केळं
 5. १ टेस्पून तांदळाची पिठी
 6. १ टीस्पून काजूचे तुकडे
 7. १/२ टीस्पून वेलचीपूड
 8. १/२ टीस्पून खायचा सोडा
 9. आप्पे तळायला साजूक तूप

सूचना

 1. साहित्य
 2. भिजवलेल्या तांदाळतले पाणी काढून, तांदूळ मिक्सरला कमीत-कमी पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे.
 3. एका पॅनमध्ये गुळ घालून त्यात १/४ वाटी पाणी घालून मंद गॅसवर तो वितळेपर्यंत ढवळावे.
 4. गुळाचे पाणी गाळून एका वाटीत काढावे, म्हणजे काही scum असेल तर गाळला जाईल.
 5. वाटलेल्या तांदळाच्या मिश्रणात केळ्याचे काप घालून, कुस्करून एकत्र करावे.
 6. आता त्यात खवलेला नारळ, वेलचीपूड, तुकडा काजू व लागेल तसे गुळाचे पाणी थोडे-थोडे करुन घालावे. (मिश्रण खूप सैल / पातळ झाले तर आप्पे तळताना खूप तूप पितं, त्यामुळे प्रमाण नीट बसवावे.)
 7. गुळाचे पाणी घातल्यावर मिश्रण पातळ होतं म्हणून त्यात तांदळाची पिठी घालून नीट मिक्स करावे.
 8. मिश्रण साधारण डोश्याच्या मिश्रणाइतपत घट्ट हवे.
 9. सर्वात शेवटी खायचा सोडा घालून मिक्स करावे.
 10. आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्याच्या प्रत्येक गोलात साजूक तूप सोडावे. चमचाभर मिश्रण प्रत्येक गोलात घालून तळावे.
 11. एका बाजून नीट शिजले की उलटवावे, गरज वाटल्यास थोडे तूप सोडावे.
 12. दोन्ही बाजूने सोनेरी रंग आला की काढावे.
 13. स्वादिष्ट नेईअप्पम खाण्यासाठी तयार आहेत. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर