Photo of MAJHA MODAK ROLL by Samiksha Mahadik at BetterButter
489
2
0.0(0)
0

MAJHA MODAK ROLL

Sep-19-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी खवलेला नारळ
  2. 1 वाटी तांदळाचे पीठ
  3. अर्धी वाटी साखर
  4. 1 चमचा वेलची पूड
  5. 1 चमचा मिल्क मसाला
  6. 1 चमचा काजू बदाम पूड
  7. पाऊण कप माझा ( मँगो ज्युस)
  8. साजुक तूप
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. प्रथम कढईमध्ये पाऊण कप पाणी घेऊन त्यात 1 चमचा साजुक तूप व किंचित मीठ घालून ते उजळवून घ्या मग त्यात तांदळाचे पीठ घाला
  2. पीठ चांगले मिक्स झाले की त्यात पाव कप माझा घाला व मिक्स करून गॅस बंद करा व 5 मिनिटे झाकून ठेवा
  3. मग दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा साजुक तूप घालून त्यात खवलेला नारळ, साखर, वेलची पूड, मिल्क मसाला, काजू बदाम पावडर घालून मिक्स करून घ्या मग त्यात अर्धा कप माझा घाला व छान मिक्स करून घ्या
  4. मिश्रण घट्ट झाले की प्लेट मध्ये काढून थंड करून घ्या सारण तयार
  5. मग मोडकाचे उकड तुपाच्या हाताने मळुन घ्या
  6. मग याचा एक गोळा घेऊन पोळपाटावर तांदळाच्या पिठाच्या साहाय्याने लाटून घ्या
  7. मग त्यावर सारण पसरावा
  8. मग त्याचा रोल करून घ्या व पाण्याचा साहाय्याने त्याच्यात कडा बंद करून घ्या
  9. मग चाळणीला तेल लावून त्यावर हे तयार रोल ठेवा व मोदक पात्रात 15 मी वाफवून घ्या थंड झाल्यावर सुरीने त्याचे काप करा व प्लेटमध्ये काढून नैवेद्य दाखवा..
  10. माझा (मँगो ज्युस)

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर