गुलाब मोदक | Rose modak Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  20th Sep 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Photo of Rose modak by deepali oak at BetterButter
गुलाब मोदकby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

1

गुलाब मोदक recipe

गुलाब मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rose modak Recipe in Marathi )

 • ओले खोबरे किसुन दोन वाटी
 • साखर अर्धीवाटी
 • गुळ अर्धी वाटी
 • तुप एक लहान चमचा
 • केशरवेलची सीरप एक चमचा
 • खवा किंवा घट्टसाय एक वाटी
 • मैदा एक वाटी
 • रवा एक लहान चमचा
 • मीठ
 • तळणीसाठी तेल

गुलाब मोदक | How to make Rose modak Recipe in Marathi

 1. कढई तापली कि तुप घालून घ्या.
 2. आता त्यात किसलेले खोबरे व साखर घाला
 3. गुळ घाला
 4. मीश्रण चांगल परतुन कोरडे करा,त्यात साय किंवा खवा घाला व केशरवेलची सीरप घाला.
 5. मीश्रण कोरडे झाले कि गार होऊ द‍या
 6. आता परातित मैदा व रवा मीठ जरा तेल घ्या
 7. पाणी घालून मळुन घ्या
 8. जरा वेळानी लहान तिन चार पुर्‍या लाटा
 9. त्या वरिल प्रमाणे ठेऊन त्यावर खोबर्रयाचे सारण मधोमध पसरवा
 10. आता करंजी सारखा आकार द्या व पाण्याचा हा फीरवून दाब द्या व सारण बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्या.
 11. आता ह्यांची गुंडाळी करून शेवटले टोक पण पाण्याच्या हात फिरवून अलगद चीकटवा.
 12. गरम तेल किंवा तुपावर अलगद तळुन घ्या. तळताना पुर्ण गुलाबावर हलके हलके तेल ऊडवत तळा.
 13. तयार तुमचे गुलाब मोदक

My Tip:

सारण बाहेर येऊ नये असे निट पाण्याच्या हाथाने दाब देऊन बनवा.

Reviews for Rose modak Recipe in Marathi (1)

Manasvi Pawara year ago

Bharich ye
Reply