मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातल्या पुऱ्या

Photo of PAKATALYA PURYA by Aditi Bhave at BetterButter
751
2
0.0(0)
0

पाकातल्या पुऱ्या

Sep-21-2018
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातल्या पुऱ्या कृती बद्दल

खुसखुशीत तोंडात घातल्यावर लगेच विरघळणाऱ्या मस्त , पाकातल्या पुऱ्या. नवरात्रात देवीला 9 दिवस रोज गोड पदार्थांचा नेवैद्य लागतो , तेव्हा एक दिवस हा नेवैद्य नक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. बारीक रवा - 1 वाटी
  2. साखर - पाऊण वाटी
  3. लिंबू - 1
  4. केशर - गरजेनुसार
  5. Dryfruits - आवडीनुसार
  6. मीठ - चिमूटभर
  7. तूप - एक मोठा चमचा
  8. खाण्याचा रंग - 2 ते 3 थेंब
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. रवा चाळून घ्यावा.
  2. रव्यात , दही, मीठ , तुपाचे मोहन व रंग घालून घट्ट भिजवावा
  3. 2 तास भिजवून ठेवावा.
  4. नंतर मळून लहान गोळ्या कराव्यात.
  5. एका पॅन मध्ये साखर व पाव वाटी पाणी घालून पक्का पाक करावा , पाक होत आला की त्यात केशर व लिंबूरस घालावा.
  6. आता पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्यात
  7. पुऱ्या गरमच पाकात घालून घ्याव्यात. पाकातून काढून प्लेट मध्ये ठेवाव्यात.
  8. त्यावर dry fruits व केशराचा काड्या लावाव्यात.
  9. पाकातल्या पुऱ्या तयार आहेत. गरम खाऊ नयेत. पाकाचा चटका बसू शकतो.
  10. लिंबू घातल्याने छान आंबट गोड चव लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर