मुख्यपृष्ठ / पाककृती / मिसळपाव मोदक

Photo of MisalPav Modak by Vaishali Joshi at BetterButter
336
2
0.0(0)
0

मिसळपाव मोदक

Sep-22-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळपाव मोदक कृती बद्दल

ह्या मोदकाची पारी मी पाव पासून बनविली व आत सारण मिसळ आणि फरसाण चे आहे मस्त खुसखुशीत होतात हे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव २ पिस
  2. कणिक २ चमचे
  3. मोड़ आलेले मूग मटकी १ कप
  4. टोमेटो १
  5. मिरच्या ४-५
  6. आल पेस्ट १ चमचा
  7. कोथिंबीर
  8. तेल
  9. मोहोरी
  10. हिंग
  11. करीपत्ता
  12. तिखट
  13. हळद
  14. धणे पावडर १ चमचा
  15. गोडा मसाला १ चमचा
  16. फरसाण १ १/२ कप

सूचना

  1. पाव मिक्सर मधे बारीक़ करून घ्या त्यात कणिक , मीठ आणि १ चमचा तेल टाकून थोडस पाणी घालून भिजवून ठेवा
  2. फरसाण थोड जाडसर कुटून घ्या
  3. मूग मटकी १० मिनिट पाणी आणि थोड मीठ घालून शिजवून घ्या , शिजल्यावर त्याला गाळून घ्या त्याचा कट बाजूला काढून ठेवा आणि मूग मटकी वेगळे ठेवा
  4. आता कढईत २ चमचे तेल घाला मोहोरी हिंग करीपत्ता आल पेस्ट घाला मिर्ची टोमेटो घालून परतून घ्या.त्यात तिखट हळद घालून परता आणि शिजवलेले मुग मटकी घालून त्यात मीठ गोडा मसाला आणि धणे पावडर घाला परतून एक वाफ येउ द्या . गैस बंद करा . थंड झाल्यावर त्यात फरसाण टाकुन कोथिंबीर घाला . मोदकात भरण्यासाठी हे सारण तयार झाले
  5. पाव आणि कणिक या पासून भिजवून ठेवलेले पीठ खूप मळून घ्या , त्याचे गोळे करून पारया लाटून घ्या, त्यात सारण भरून मोदक करून घ्या
  6. तेलात तळून घ्या
  7. आता कट फ़ोडनीला घालून घेऊ
  8. गैस वर कढईत तेल घाला ते तापल्यावर अनुक्रमे मोहोरी , हिंग , करी पत्ता , मिर्ची , टोमेटो घालून थोड शिजल्यावर तिखट , हळद , धणे पावडर , गोडा मसाला टाकून परतवून कट टाका सोबत थोड पाणी घाला . मीठ टाकून उकळू द्या
  9. आता सगळ व्यवस्थीत मोदक सजवून नैवेद्य दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर