मुख्यपृष्ठ / पाककृती / Simple steam modak

Photo of Simple steam modak by deepali oak at BetterButter
0
2
0(0)
0

Simple steam modak

Sep-23-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. सुगंधी मोदक पीठ अर्धा किलो
 2. नारळ दोन ते तिन किसुन
 3. गुळ अर्धा किलो
 4. वेलची पावडर दोन चमचे
 5. मीठ
 6. तेल
 7. पाणी
 8. साजूक तुप

सूचना

 1. परातीत सुगंधी तांदुळपीठी घ्या.
 2. त्यात मीठ व दोन चमचे तेल किंवा तुप घालून पाण्याने पीठ भाकरीला भिजवतो त्या पेक्षा जरा सैलसर भिजवून घ्या
 3. आता एका घट्ट झाकण असलेलया डब्यात हे भीजवलेले पीठ ठेवा व झाकण लावा.
 4. आता कुकरमध्ये पाणी घालून हा डबा कुकर मध्ये ठेवा
 5. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून कुकरला झाकण लावून हे पीठ १० मीनिटे वाफवा
 6. आता तोवर सारण तयार करून घ्या
 7. सारणासाठी कढईत दोन चमचे तुप तापले कि किसलेले खोबरे परतुन घ्या.
 8. आता ह्यामध्ये बारीकसा चीरून गुळ घाला व वेलची पावडर घाला
 9. मीश्रण गार करत ठेवा
 10. आता कुकर मधून कणीक बाहेर काढून तेल पाण्याच्या हाताने पीठ छान मळुन घ्या
 11. आता मऊसुत गोळ्याची पारी तयार करा
 12. त्यात सारण भरा
 13. बाजूने घड्या घाला
 14. आता अलगद घड्यांना दाबुन मोदकाचा आकार द्या
 15. असे मोदक तयार करून घ्या
 16. आता मोदक पात्राच्या चाळणीवर तेलाचा हात फिरवून बनवलेले मोदक एक एक पाण्यात बुडवून चाळणीवर ठेवा
 17. मोदक १० ते १२ मिनिटे ऊकडुन घ्या
 18. तयार तुमचे झटपट मोदक..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर