BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango Poori In Sugar Syrup

Photo of Mango Poori In Sugar Syrup by Sanika SN at BetterButter
1
4
2(1)
0

Mango Poori In Sugar Syrup

Sep-24-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • फ्रायिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. १ वाटी मैदा
 2. १/२ वाटी पेक्षा जरा कमी बारीक रवा
 3. अंब्याचा रस मैदा भिजवण्यापुरता लागेल तसा घ्यावा
 4. ३/४ वाटी साखर (प्रमाण आमरसाच्या गोडीवर ठरवावे किंवा आपल्या आवडीनुसार)
 5. १/२ वाटी पाणी
 6. १/२ टीस्पून वेलचीपूड
 7. १/४ टीस्पून जायफळपूड
 8. केशराचा काड्या
 9. १/२ टीस्पून लिंबाचा रस
 10. १ टेस्पून बदाम +पिस्ता+काजू तुकडे सजावटीसाठी
 11. ३ टेस्पून तेल
 12. पुर्‍या तळण्यासाठी तेल / तूप

सूचना

 1. साहित्य
 2. एका भांड्यात मैदा,रवा एकत्र करावे.
 3. त्यात ३ टेस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालावे.
 4. चांगले मिक्स करुन घ्यावे.
 5. आमरस थोडा थोडा करून मैद्यात घालावा व नीट मिक्स करावे.
 6. पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे व झाकून १५-२० मिनिटे ठेवावे.
 7. १५-२० मिनिटांनंतर पीठ चांगले कुटून घ्यावे किंवा रवा-मैदा चांगला मळून घ्यावा.
 8. मोठी जाडसर पोळी लाटून हव्या त्या आकाराच्या, लहान-मोठ्या पुर्‍या कातून घ्याव्यात.
 9. दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे.
 10. वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे.
 11. साखरेचा दोन तारी पाक तयार करा.
 12. तळणीत अलगद पुर्‍या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या.
 13. पुर्‍या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा.
 14. दुसर्‍या पुर्‍या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्‍या निथळून ताटात काढून ठेवा.
 15. कोलाज फोटोचा दुसरा भाग
 16. सर्व पुर्‍यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे.
 17. सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात.
 18. नेहमीच्या पुर्‍यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्‍या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो.
 19. पुर्‍या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात.
 20. अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्‍या करता येतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Sep-26-2018
Manasvi Pawar   Sep-26-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर