Photo of Plum Chutney by Sanika SN at BetterButter
614
3
0.0(0)
0

प्लम चटणी

Sep-25-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्लम चटणी कृती बद्दल

चटकदार, चटपटीत चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 4

  1. १२-१५ पिकलेली प्लम्स
  2. साधारण १/२ वाटी चिरलेला गुळ (प्लम्सच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण घ्यावे)
  3. १/२ टीस्पून मोहरी
  4. १/२ टीस्पून जीरे
  5. १/२ टीस्पून बडीशेप
  6. ३-४ लवंगा
  7. १/२ इंच आले किसून घेणे
  8. १-१/४ टीस्पून लाल तिखट
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. प्लमस स्वच्छ धुवून, बिया काढून, बारीक फोडी करुन घेणे.
  3. पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, लवंगा घालून फोडणी करणे.
  4. मोहरी तडतडली की जीरे व बडीशेप घालून परतणे.
  5. आता त्यात चिरलेले प्लम्सचे तुकडे घालून ५ मिनिटे परतणे.
  6. प्लमला पाणी सुटून ते मऊसर होतील, जमेल तसे चमच्याने गर दाबून घ्यावा.
  7. आता त्या किसलेले आले व मीठ घालून घेणे.
  8. दोन मिनिटे परतल्यावर त्यात लाल तिखट व गुळ घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहणे.
  9. ४-५ मिनिटांनी मिश्रणातील ओलसरपण कमी होऊन मिश्रण दाट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा.
  10. चटणी पूर्ण गार होऊ द्यावी.
  11. कोलाज फोटोचा दुसरा भाग
  12. स्टरलाईज्ड बरणीत चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते.
  13. ही चटणी तोंडीलावणे म्हणून किंवा पराठे, ब्रेड, पॅनकेक्ससोबत किंवा क्रॅकर्स व चीझसोबत सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर