मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर-गुलाब शिरा

Photo of Saffron-Rose Sooji Halwa by Sanika SN at BetterButter
690
1
0.0(0)
0

केशर-गुलाब शिरा

Sep-25-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर-गुलाब शिरा कृती बद्दल

केशर आणि गुलाबाच्या स्वादाचा सूमधूर शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी रवा
  2. अडीच वाट्या दूध
  3. ३/४ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
  4. १/4 वाटी साजूक तूप
  5. १ टीस्पून वेलचीपूड 
  6. १ टीस्पून थोड्या कोमट दुधात मिसळलेले केशर
  7. अर्धा टीस्पून रोझ वाॅटर / एसेंस
  8. काजु, बेदाणे, बदामाचे काप, सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी
  9. पिस्त्याची पावडर वरून भुरभूरण्यासाठी

सूचना

  1. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यावे.
  2. त्याच पॅनमध्ये तूप गरम करून मध्यम आचेवर रवा चांगला भाजून घ्यावा.
  3. रवा हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा.
  4. एकीकडे दूध व केशरमिश्रित दूध एकत्र करून उकळी काढावी.
  5. भाजलेल्या रव्यात बेदाणे व उकळलेले दूध घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे.
  6. रवा चांगला फुलला पाहिजे.
  7. आता त्यात साखर घालून एकत्र करावे व पुन्हा झाकून ३-४ मिनिटे शिजवावे. 
  8. शेवटी वेलचीपूड, रोझ वाॅटर घालून चांगले मिक्स करावे. 
  9. बदामाचे काप व सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवावे.
  10. सर्व्हिंग प्लेटमध्ये पिस्त्याची पावडर भुरभूरून शिरा गरम सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर