Photo of Patole by Manisha Khatavkar at BetterButter
1164
1
0.0(0)
0

पातोळे

Sep-27-2018
Manisha Khatavkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातोळे कृती बद्दल

पातोळे हा महाराष्ट्र, गोव्यात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. नागपंचमी ला आणि गौरी, गणपती ला नैवेद्य म्हणून पातोळे बनवतात. उकडीच्या मोदकासारखे पण मोदकापेक्षा सोपे असे पातोळे हळदीच्या पानात वाफवतात. हळदीचा फार छान स्वाद येतो पातोळ्याला. हळदीची पानं नसतील तर केळीची पानं वापरू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गोवा
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ताजा खवलेला नारळ अडीच कप
  2. चिरलेला गूळ दीड ते दोन कप
  3. वेलची पूड पाव चमचा
  4. मीठ १ चमचा
  5. तांदुळाचे पीठ दीड कप (सुगंधी तांदुळाचं / मोदकाचं पीठ असेल तर उत्तम)
  6. साजूक तूप १ चमचा
  7. हळदीची पानं १० मोठी

सूचना

  1. सारणासाठी खवलेला नारळ आणि गूळ मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून मिक्स करा आणि ताटलीत काढून मिश्रण गार करा.
  2. आवरणासाठी तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. पाणी घालून सरसरीत पेस्ट बनवा. फार पातळ नको आणि फार घट्ट ही नको. पानावर व्यवस्थित पणे सारवता आली पाहिजे.
  3. हळदीची पानं धुवून पुसून घ्या. मोठी पानं असतील तर एका पानाचे दोन तुकडे करा (लांब बाजू कापा ). प्रत्येक पानाला थोडं तूप लावून घ्या.
  4. थोडी तांदुळाची पेस्ट हळदीच्या पानावर एकसारखी पसरा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.
  5. आता थापलेल्या / सारवलेल्या पिठावर शीरेच्या एका बाजूला सारण पसरवा. अगदी कडेपर्यंत पसरू नका.
  6. पानाच्या शीरेवर पानाची घडी घाला म्हणजे सारणाच्या दोन्ही बाजूला पिठाचं आवरण येईल . कडा हलक्या हातानं दाबून बंद करा.
  7. सगळी पाने अशी तयार करून घ्या.
  8. इडली / मोदक पात्रात पाणी गरम करून त्यातल्या जाळीवर ही पाने लावा. झाकण बंद करून १५ मिनिटं वाफवून घ्या. शिजलेले पातोळे पानाला चिकटत नाहीत. ७. गरमागरम पातोळे साजूक तुपाबरोबर खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर