मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ बालुशाही

Photo of Stuff balushahi by Pranali Deshmukh at BetterButter
943
5
0.0(0)
0

स्टफ बालुशाही

Sep-27-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ बालुशाही कृती बद्दल

बालुशाही खाताना ती बरेचदा आतून फिकी लागते पण अशी स्टफ बालुशाही करून बघा प्रसादाला .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मैदा
  2. चिमुभर खाण्याचा सोडा
  3. 1 tbs तूप स्टफिंग भाजण्यासाठी
  4. मीठ चवीपुरतं
  5. गाजराचा किस 1/4 कप
  6. काळा खजूर 3 tbs सिडलेस
  7. मिल्कपावडर 2 tbs
  8. काजू बदाम पूड 2 tbs
  9. वेलची पावडर 1 tbs
  10. साखर 1 कप
  11. तूप तळण्यासाठी

सूचना

  1. मैदा गाळून घ्या त्यामध्ये मीठ सोडा तूप आणि दही , मिक्स करा
  2. हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या वीस मिनिट बाजूला ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा.
  3. आता कढईत एक चमचा तूप घाला आणि गाजराचा किस परतवून घ्या
  4. आता खजूर जरा मॅश करून घाला आणि गजरात मिक्स करा जेणेकरून दोन्हींची चव एक व्हायला हवी .
  5. आता मिल्कपावडर ऍड करा आणि मिक्स करा सारणाला जरा खव्याची चव येते .
  6. आता ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालून मिक्स करा आणि थंड करायला प्लेटमध्ये काढून घ्या .
  7. पीठ हातानी चुरून घ्या लिंबाएकवढे गोळे करून घ्या
  8. एका पॅनमध्ये साखर आणि साखर भिजेल इतकं पाणी घाला आणि दुसरीकढे पाक बनवायला ठेवा पाक दोन तारी हवाय .
  9. एक गोळा घेऊन त्याला बोटानी परीसारखं करा आणि मध्ये सारण भरा
  10. सर्व बाजूनी बंद करून घ्या हातानी प्रेस करा आणि मध्ये थोडं बोटानी छिद्रासारखं प्रेस करायचं आत सारण असल्यामूळे आपण छिद्र करणार नाही .अशाप्रकारे सर्व बालुशाही बनवून घ्या .
  11. तूप तापवायला ठेवा आणि मंद मध्यम आचेवर हलक्या गोल्डन तळून घ्या आणि लगेच पाकात टाका
  12. पाकात 20मिनिट राहू द्या वर चकाकी आल्यावर काढा आणि प्रसादाला सर्व्ह करा .
  13. आतून टेस्टी आणि नेहमीपेक्षा वेगळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर