मुख्यपृष्ठ / पाककृती / चटनी कोशिंबीर ज्वारी पिठाचे मोदक

Photo of Chatni Koshimbir Jwari Pithache Modak by Vaishali Joshi at BetterButter
836
1
0.0(0)
0

चटनी कोशिंबीर ज्वारी पिठाचे मोदक

Sep-27-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटनी कोशिंबीर ज्वारी पिठाचे मोदक कृती बद्दल

नैवेद्याच्या पानात सोबतीला हे वेगळ्या चवीचे मोदक वाढा . ज्वारी चे पीठ , तिखट चटनी आणि सोबत कोशिंबीर एक खुप छान कॉमबिनेशन चे गरमागरम मोदक वर फोडनिचे तेल ... नक्की करून बघा हे नाविन्यपूर्ण मोदक .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारीचे पीठ १ कप
  2. कणिक २ चमचे
  3. हिरव्या मिरच्या ६-७
  4. कोथिंबीर
  5. खोब्र्याचे काप २ चमचे
  6. जीर १/४ चमचा
  7. लिंबू १
  8. गाजर १ छोट
  9. शेंगदाणे कूट २ चमचे
  10. तेल
  11. मोहोरी
  12. हिंग
  13. हळद
  14. मीठ

सूचना

  1. सगळ साहित्य एक प्लेट मधे जमा करून घ्या
  2. ज्वारीचे पीठ व कणिक एकत्र करा आणि मीठ टाकुन कोमट पाण्या ने मळूुन ठेवा
  3. हिरव्या मिरच्या , खोबऱ्या चे काप , जीर , कोथिंबीर , मीठ पॉट मधे घालून मिक्सर मधे चटनी करून ठेवा.
  4. गाजर किसुन घेवुन त्यात शेंगदाणे कूट , मीठ , लिंबाचा रस ,कोथिंबीर घालून एकत्र करुन कोशिंबीर करा आणि हिंग , मोहोरी , मिर्ची , हळदी ची फोडनी द्या . मिक्स करून घ्या . तयार चटनी आणि तयार कोशिम्बिर हलक्या हाताने एकत्र करून हे सारण प्लेट मधे काढून घ्या
  5. आता मळून ठेवलेले पीठ पाण्याचा हात लावून अजून मळून घ्या थोडा तेलाचा हात लावून गोळे करून ठेवा
  6. एक एक गोळा घेउन त्याची पारी बनवा आणि त्यात चटनी कोशिंबीरी चे सारण भरा आणि मोदक करून घ्या .अशा प्रकारे सगळे मोदक करा
  7. तयार मोदक १५ मिनिट वाफवून घ्या . शिजल्याची खात्री करा . बाह्रेर काढून त्यावर तेल मोहोरी ची फोडनी चमच्याने थोड़ी थोड़ी घाला .
  8. मोदक तयार नैवेद्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर