मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रसादासाठी सारण भरलेली गोड इडली

Photo of Stuffed sweet Idli for Prasad by archana chaudhari at BetterButter
1150
3
0.0(0)
0

प्रसादासाठी सारण भरलेली गोड इडली

Sep-27-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रसादासाठी सारण भरलेली गोड इडली कृती बद्दल

नारळाचे गोड सारण भरलेल्या छोट्या छोट्या इडल्या चवीला खूप छान लागतात.

रेसपी टैग

  • मध्यम
  • स्टीमिंग
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 10

  1. सारणासाठी
  2. खवलेला खोबरे २ वाट्या
  3. गूळ १वाटी
  4. वेलची १/२ टीस्पून
  5. काळे मिरे १/२ टीस्पून (जाडसर कुटून)
  6. इडलीचे तयार मिश्रण २ वाट्या
  7. तूप १ टीस्पून

सूचना

  1. सारणासाठी कढईत १चमचा पाणी टाकून गूळ टाका.
  2. गूळ पूर्णपणे वितळल्यावर खवलेले खोबरे टाका.
  3. छान एकत्र होईपर्यंत हालवत रहा, नंतर वेलची आणि मिरे टाका.
  4. एका भांड्यात काढून ठेवा.
  5. आता इडलीच्या पात्राला तूप लावून घ्या.
  6. अगदी थोडे इडलीचे पीठ घाला, आणि त्यावर सारणाचे थोडे मिश्रण घाला .
  7. आता वरून परत एकदा इडलीचे पीठ घाला.
  8. अश्याप्रकारे सगळ्या इडल्या भरून घ्या.
  9. आता इडल्या १० मिनिटे वाफवून घ्या.
  10. प्रसादासाठी सारण भरलेल्या गोड इडल्या तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर