BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / राघवदास लाडू

Photo of Raghavdas Laddu by Suchita Wadekar at BetterButter
0
2
0(0)
0

राघवदास लाडू

Sep-27-2018
Suchita Wadekar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राघवदास लाडू कृती बद्दल

राघवदास लाडू म्हणजे रवा- नारळाचे गोड लाडू. हे आल्या नारळाचे पाकातील गोड लाडू, खायला खूप छान लागतात. विशेष म्हणजे इथे गाईचे तूप वापरल्यामुळे लाडूला छान कलर येतो आणि बघताक्षणी खावेसे वाटतात. हे लाडू सात ते आठ दिवस टिकतात परंतु फ्रीज मध्ये ठेवलेत तर 15-20 दिवस आरामात टिकतात. हे लाडू दिसायला सुंदर, खाण्यास चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने पौष्टीक आहेत. ओला नारळ घातल्यामुळे मुलांना अतिशय आवडतात. शॉर्ट ब्रेक टिफिनसाठी हा उत्तम पर्याय आहे. हे लाडू बनवायला सोपे आणि झटपट होतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. बारीक रवा 2 वाटी
 2. साखर दीड वाटी
 3. गाईचे तूप 1 वाटी
 4. वेलची पावडर 1 टेबल स्पून

सूचना

 1. 1. मापासाठीची वाटी
 2. 2. पाऊण वाटी तूप, एक वाटी खोवलेला नारळ, 1 टेबल स्पून वेलचीपावडर, 2 वाटी रवा चाळून मापाच्या वाटीने मोजून घ्यावा.
 3. 3. रव्यामध्ये थोडे-थोडे तूप टाकत रवा भाजून घ्यावा.
 4. 4. रवा भाजला की तो एका प्लेट मध्ये काढून घ्यावा.
 5. 5. त्याच कढईत थोड्याशा तुपावर एक वाटी खोवलेला ओला नारळ परतून घ्यावा.
 6. 6. परतलेला नारळ किस प्लेटमध्ये काढून घ्यावा.
 7. 7. त्याच कढईत मापाच्या वाटीने मोजून घेतलेली दीड वाटी साखर घ्यावी आणि त्यात साखर बुडेल इतपत साधारणतः अर्धी वाटी पाणी घालावे.
 8. 8. साखर विरघळून एक उकळी आली की गॅस बंद करावा आणि त्यात परतलेला ओला नारळ घालावा आणि मिश्रण हलवावे.
 9. 9. यानंतर यात वेलची पावडर घालून मिश्रण पुन्हा हलवावे.
 10. 10. यानंतर यात तुपावर भाजलेला रवा घालावा व सर्व एकत्र करावे
 11. 11. मिश्रण गरम असल्यामुळे लगेच लाडू वळता येत नाहीत
 12. 12. त्यामुळे पाच मिनिटांसाठी यावर झाकण ठेवावे.
 13. 13. पाच मिनिटांनी झाकण उघडून मिश्रण नीट हलवून घ्यावे आणि हाताला तूप लावून लाडू वळावेत. आवश्यकता वाटल्यास पाव वाटी गरम तूप घालावे आणि लाडू वळावेत.
 14. 14. आपले राघवदास लाडू तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर