मुख्यपृष्ठ / पाककृती / साठा रंगीत करंजी

Photo of Satha Karanji by Bharti Kharote at BetterButter
1454
3
0.0(0)
0

साठा रंगीत करंजी

Sep-28-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साठा रंगीत करंजी कृती बद्दल

महालक्षमी नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. दोन वाट्या मैदा
  2. अर्धी वाटी रवा
  3. अर्धी वाटी तुपाचे मोहन
  4. दोन चमचे पिठी साखर
  5. चिमूटभर मीठ
  6. आवश्यकतेनुसार दूध
  7. ऑरेंज फूड कलर अर्धा चमचा
  8. सारणासाठी. .....
  9. दीड वाटी खोबरे खीस सुखे
  10. अर्धी वाटी रवा
  11. एक वाटी पीठी साखर
  12. एक चमचा वेलची पूड
  13. एक चमचा खसखस
  14. आवडीनुसार ड्रायफ्रूटस चे तुकडे
  15. दोन चमचे तूप
  16. तळण्यासाठी तेल
  17. साठा बनवण्यासाठी
  18. चार चमचे काॅरन फलोवर
  19. दोन चमचे वनस्पती तूप

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा रवा घेऊन त्यात कडकडीत तुपाचे मोहन घाला. .
  2. मीठ आणि पीठी साखर घालून चांगल मिक्स करून घ्या. .थोडे थोडे दूध घालून गोळा मळून घ्या. .
  3. झाकण ठेवून बाजूला ठेवा. .
  4. आता साठा बनवून घ्या
  5. दोन चमचे वनस्पती तूप घेऊन त्यात चार चमचे काॅरन फलोवर घालून चांगल फेटून घ्या. .
  6. आता सारण बनवून घ्या. .
  7. एका वाडग्यात भाजलेले खोबरे खीस आणि भाजलेला रवा घ्या. .त्यात पीठी साखर वेलची पूड ड्रायफ्रूटस चे तुकडे घालून चांगल मिक्स करून घ्या. ..
  8. आता कणिक दोन भागात विभागा
  9. एका भागात ऑरेंज फूड कलर घालून चांगल मळून घ्या. .
  10. आता पांढरी आणि ऑरेंज पोळी लाटून घ्या. .
  11. आता पांढरी पोळी घेऊन तीला साठा लावून घ्या. .त्या वर ऑरेंज पोळी ठेवा. परत साठा लावून घ्या परत पांढरी पोळी ठेवा. .साठा लावून घ्या. ...त्या वर ऑरेंज पोळी ठेवून गुंडाळी करा. ..
  12. आता लाटया कापून घ्या. .
  13. पूरी सारखे हलक्या हाताने लाटून घ्या. .
  14. त्यात सारण भरून बाजूंनी बोटांनी दूध किंवा पाणी लावून करंजी बंद करून घ्या. .
  15. फिरकी किंवा काटा चमचा वापरुन डिझाईन तयार करा. .
  16. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापत ठेवा. .
  17. तेल तापल्यावर मंद आचे वर करंजी तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर