खांडवी | Khandvi Recipe in Marathi

प्रेषक Chef (Mrs) Reetu Uday Kugaji  |  25th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Khandvi by Chef (Mrs) Reetu Uday Kugaji at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2978

0

खांडवी

खांडवी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandvi Recipe in Marathi )

 • बेसन - 1 वाटी
 • आंबट ताक - 3 वाट्या
 • आले - 1 इंच तुकडा
 • हिरव्या मिरच्या - 2 नग
 • रिफाईन्ड तेल - 3 मोठे चमचे
 • मीठ - चवीनुसार
 • अर्धा लहान चमचा हळद पावडर
 • लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
 • हिंग - चिमूटभर
 • मोहरी - 1 लहान चमचा
 • ताजे खवलेले नारळ - 2 लहान चमचे
 • ताजी कोथिंबीर - 1/4 जुडी

खांडवी | How to make Khandvi Recipe in Marathi

 1. एका काचेच्या बडग्यात बेसन चाळा. हिरव्या मिरच्यांमधील बिया काढा आणि आले आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करा.
 2. काही स्टीलच्या ताटांना मागच्या बाजूला किंवा मार्बलच्या टेबल टॉपवर थोडे थोडे तेल लाऊन ठेवा. यामुळे खांडवीचे मिश्रण यावर चिकटणार नाही आणि सहज त्याच्या वळकुट्या होतील.
 3. बेसनात आले-मिरची पेस्ट घाला. बरोबर मीठ हळद, लिंबाचा रस आणि ताक घाला. याला चांगले ढवळा आणि गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.
 4. आता एका जाड बुडाच्या पॅनमध्ये या मिश्रणाला घालून जोपर्यंत मिश्रण लुसलुशीत आणि जाड होत नाही, तोपर्यंत सतत ढवळत रहा. हे अगदी थोड्या वेळात तयार होते.
 5. नंतर या मिश्रणाला लगेचच काढून तेल लावलेल्या ताटावर ठेवा आणि जोपर्यंत गरम आहे, तोपर्यंत जितके पातळ पसरवता येईल तितके पसरावा.
 6. हे थंड झाले की त्याला 2-2 इंचाच्या अंतरावर कापा आणि नंतर गोल गोल वळकुट्या करा.
 7. आता एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा आणि त्यात चिमूटभर हिंग आणि मोहरी घाला.
 8. मोहरी तडतडायला लागली की त्याला खांडवीवर घाला.
 9. याला खवलेले नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि त्वरित वाढा.
 10. कोथिंबीरिची चटणी, कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा लसणाच्या चटणीबरोबर स्वादिष्ट लागेल.

My Tip:

1. तुम्ही फोडणीत कडीपत्त्याची पाने आणि एकदम बारीक चिरलेली मिरची देखील घालू शकता. 2. फोडणी जळू देऊ नका कारण यामुळे खांडवीला कडवट गंध येईल. 3. तुम्ही बनविलेल्या खांडवीवर अर्धा चमचा किंचित भाजलेले तीळ शिंपडू शकता.

Reviews for Khandvi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo