मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी नाचणीच्या पिठाचे मोदक(डायबेटिक फ्रेंडली)

Photo of Healthy Ragi Flour Modak(Diabetic friendly) by Archana Chaudhari at BetterButter
309
1
0(0)
0

हेल्दी नाचणीच्या पिठाचे मोदक(डायबेटिक फ्रेंडली)

Sep-29-2018
Archana Chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी नाचणीच्या पिठाचे मोदक(डायबेटिक फ्रेंडली) कृती बद्दल

प्रसादासाठी उत्तम असणारे हे मोदक डायबेटिक साठी,वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यां साठी,थोडक्यात काय सगळ्यांसाठीच छान आहेत.

रेसपी टैग

 • मध्यम
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. कव्हरसाठी- नाचणीचे पीठ १ वाटी
 2. मीठ २ चिमूट
 3. तुप १ टीस्पून
 4. पाणी १ वाटी
 5. दूध १ टीस्पून
 6. सारणासाठी-
 7. गहू कोंडा ३ टेबलस्पून
 8. डाळव २ टेबलस्पून
 9. ओट्स ३ टेबलस्पून
 10. गूळ २ टेबलस्पून
 11. सुके अंजीर ३
 12. काळे मनुके ४
 13. बदाम ५(भाजून तुकडे केलेले)
 14. तूप १ टेबलस्पून
 15. खसखस १/२ टीस्पून(थोडीशी भाजून)
 16. विलायची १
 17. पाणी १/४ कप
 18. दूध १/४ कप

सूचना

 1. कव्हर बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी,मीठ,तूप,दूध एकत्र करून उकळी आणा.
 2. उकळी आल्यावर गॅस कमी करून त्यात नाचणीचे पीठ घालावे.आणि छान एकत्र करून गॅस बंद करून झाकण ठेवून १० मिनिटे झाकून ठेवावे.
 3. गरम असतानाच तेलाचा हात लावून मळून त्याचा गोळा बनवून कपड्याने झाकून ठेवा.
 4. आता सारणासाठी,गव्हाचा कोंडा कमी आचेवर खमंग भाजून घ्यावा.
 5. याच प्रमाणे ओट्स भाजून घ्या.
 6. डाळव पण भाजून घ्या.
 7. थोडं गार झाल्यावर ओट्स आणि डाळव मिक्सरमधून बारीक पीठ करून घ्या.
 8. अंजीरचे बारीक तुकडे करून घ्या.
 9. काळे मनुकांचे पण बारीक तुकडे करा.
 10. वेलचीची पूड करून घ्या.
 11. आता कढईत तूप गरम करायला ठेवा,त्यात गव्हाचा कोंडा,ओट्स आणि डाळव पीठ घालून छान खरपूस भाजून घ्या.
 12. दूध आणि पाणी गरम करून घाला.
 13. त्यात अंजीर,मनुके,बदाम घाला.
 14. गूळ, खसखस, वेलची पूड घाला.
 15. मिश्रण छान एकत्र झाले की एका भांड्यात काढून ठेवा.
 16. उकड आणि सारण तयार आहे.
 17. आता उकडीचे सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्या.
 18. एक गोळा घेऊन त्याला पुरीसारखा आकार देऊन,त्याला कळ्या पडून आतमध्ये सारण भरा.
 19. व्यवस्तीत बंद करून घ्या.
 20. या प्रमाणे सगळे मोदक बनवून घ्या.
 21. आता वाफावयच्या भांड्यात कपडा टाकून प्रत्येक मोदक पाण्यात बुडवून कपड्यावर ठेवा(खाली चिटकत नाही).
 22. १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
 23. मोदक हाताला चिकटला नाही म्हणजे मोदक झाले.
 24. हेल्दी नाचणीचे मोदक तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर