Photo of Rawa Ladu by Nivedita Walimbe at BetterButter
1168
1
0.0(0)
0

रवा लाडू

Sep-30-2018
Nivedita Walimbe
1800 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

प्रसादासाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. जाड रवा दोन वाट्या
  2. साखर दीड वाटी
  3. खोवलेला नारळ एक ते दीड वाटी
  4. वेलदोडा पूड एक टेबल स्पून
  5. साजूक तूप पाऊण वाटी
  6. पाकासाठी थोडेसे पाणी
  7. बेदाणे सजावटीसाठी

सूचना

  1. कढईमध्ये रवा व तूप एकत्र करून मंद आचेवर भाजून घ्यावा
  2. रवा भाजत आला की त्यात नारळ चव घालून पुन्हा थोडावेळ भाजावा
  3. रवा भाजल्याचा सुगंध पसरला पाहिजे
  4. साखरेचा थोडेसे पाणी घालून एकतारी पाक करावा
  5. त्यात भाजलेला रवा व वेलदोडा पूड घालून चांगले हलवून ठेवावे
  6. त्याकडे येताजाता लक्ष ठेवावे
  7. मिश्रण घट्ट झालेय असे वाटले की हाताने पुन्हा चांगले मळून घ्यावे
  8. त्याचे छोट्या आकाराचे लाडू वळावेत
  9. प्रत्येक लाडूवर बेदाणा लावावा
  10. असे तयार केलेले लाडू नैवेद्य, प्रसादासाठी उत्तम

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर