मुख्यपृष्ठ / पाककृती / नैवेद्याचे ताट

Photo of Bhog Thali/ Platter by Renu Chandratre at BetterButter
1464
2
0.0(0)
0

नैवेद्याचे ताट

Sep-30-2018
Renu Chandratre
40 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नैवेद्याचे ताट कृती बद्दल

देवाला पूजे नंतर नैवेद्याचे ताट , कुठल्याही पूजे नंतर देवाला आवर्जून नैवेद्यासाठी करतात.. या ताटात पुरी, दोन सुक्या भाज्या , दुधी चणा डाळ भाजी, चवळी बटाटा भाजी, आमटी, बासुंदी, भरलेली भोपळी मिरची , टोमॅटो सार मोदक आणि काकडी व फळे आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ 4 वाटी
  2. तेल 4 वाटी
  3. बटाटे बारीक चिरलेला 4
  4. सिमला मिरची 4-6
  5. उकडलेला बटाटा मॅश करून 2 वाटी
  6. लाल तिखट 2 चमचे
  7. हळद 1 चमचा
  8. धणे पुड 2 चमचे
  9. मीठ चवीनुसार
  10. चणा डाळ 1 मोठा चमचा
  11. दुधी सोलून बारीक चिरलेला 4 कप
  12. चवळी निवडून चिरलेली 2 वाटी
  13. तुरी ची डाळ धुवून पाण्यात भिजवून ठेवलेली 1 वाटी
  14. चिंचेचा कोळ 1 ते 2 मोठा चमचा
  15. टॉमेटो प्युरी 3 वाटी
  16. ओल्या नारळा चा चव 1/2 वाटी
  17. साखर चवीनुसार
  18. गूळ 2 चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम एका परातीत , गव्हाचे पीठ, थोडे मीठ, 2 चमचे तेल घालून मिक्स करावे
  2. पाण्याने घट्ट पीठ मळून 10 ते 15 मिनीटे झाकून ठेवावे
  3. नंतर तयार पिठाच्या थोडे तेल लावून लाट्या करा
  4. कढईत तेल गरम करून , त्यात लाट्या फुगे पर्यंत दोनी कडून तळून घ्यावेत । पुर्या तयार आहे
  5. आमटी साठी , भिजलेल्या तुरीच्या डाळीत चवीपुरते मीठ, हळद घालून , कुकर मध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे
  6. एक भांड्यात 1 मोठा चमचा तेल गरम करून , त्यात मोहरी , जीरे कढी पत्ता ची फोडणी करावी
  7. लगेच हळद तिखट धणे पूड आणि गोडा मसाला घालून , हलवावे ।
  8. तयार फोडणीत शिजलेली डाळ, गूळ, चिंचेचा कोळ आणि थोडे नारळाचे चव घालूम मिक्स करावे ।
  9. एक व्यवस्थतीत उकळी आली की आमटी तयार । वरून कोथिंबीर घालावी ।
  10. दुधी चणा डाळ भाजी करता , चणा डाळ धुवून 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे। एका कढईत तेल गरम करा, त्यात मोहरी जीरे हळद तिखट घाला
  11. लगेच बारीक चिरलेला दुधी, भिजलेली चणा डाळ, आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे। मऊ होईपर्यंत झाकून शिजवा
  12. भाजी शिजली की त्यात चवीला साखर घालून मिक्स करावे , वरून कोथिंबीर घालून मिक्स करावे। दुधी भोपळा चणा डाळ भाजी तयार।
  13. टोमॅटो सार करिता, एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी जीरे कढी पत्ता ची फोडणी करावी
  14. त्यात नारळाचा चव , टोमॅटो प्युरी , मीठ आणि थोडे गूळ व गरजे पुरते पाणी घालून शिजवावे
  15. टोमॅटो सार तयार आहे ।
  16. भरलेली भोपळी मिरची साठी , उकडलेले बटाटे मॅश करा, त्यात सर्व मसाले, साखर आणि चवीला मीठ घालून मिक्स करा
  17. भोपळी मिरची चा देठ काढा आणि त्यात भोक पाडा
  18. जास्तीच्या बिया काढून टाका । आणि त्यात बटाट्याचे तयार सारण व्यवस्थित दाबून भरा
  19. या प्रकारे सर्व भोपळी मिरच्या भरून घ्या
  20. एका कढईत तेल गरम करा आणि सर्व भरलेल्या मिरच्या त्यात तेलावर झाकून शिजवा। अधून मधून परतावे ।
  21. शेवटी सर्व तयार पदार्थ ताटात ठेवावेत आणि देवा ला नैवेद्य दाखव्हावा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर