मुख्यपृष्ठ / पाककृती / बार्बीक्यू चिकन

Photo of Barbeque Chicken by archana chaudhari at BetterButter
1800
1
0.0(0)
0

बार्बीक्यू चिकन

Oct-01-2018
archana chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बार्बीक्यू चिकन कृती बद्दल

एक साईड डिश म्हणून खाण्यासाठी खूप छान सोपा पदार्थ आहे.चिकन मध्ये प्रोटीन भरपुर प्रमाणात उपलब्ध असते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकन १५० ग्रॅम (बोनलेस क्यूब्स)
  2. आले लसूण पेस्ट१ टीस्पून
  3. तिखट १/२ टीस्पून
  4. हळद १/४ टीस्पून
  5. गरम मसाला १/४ टीस्पून
  6. तंदुरी मसाला १/२ टीस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. दही २ टीस्पून
  9. ऑलिव्ह ऑइल १/२टेबलस्पून
  10. बार्बीक्यू सॉस १ टेबलस्पून
  11. चिली सॉस १टीस्पून

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ,हळद,तिखट,गरम मसाला,तंदुरी मसाला,आले लसूण पेस्ट, दही लावून २० मिनिटे मॅरीनेट करायला ठेवा.
  2. एका नॉनस्टिक पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल टाका आणि त्यात वरील मॅरीनेट केलेले चिकन टाका.
  3. छान परतवून घ्या.
  4. झाकण ठेवा आणि मधम आचेवर चिकन पूर्ण पणे शिजू द्या.
  5. आता गॅस मोठा करून चिकनला सुटलेले पाणी पूर्णपणे कमी करा.
  6. शेवटी बार्बीक्यू सॉस,चिली सॉस टाकून २ मिनिटे परतवून घ्या.
  7. बार्बीक्यू चिकन तयार!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर