मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वीट कॉर्न मसाला इडली

Photo of SWEET CORN MASALA IDALI by Samiksha Mahadik at BetterButter
556
0
0.0(0)
0

स्वीट कॉर्न मसाला इडली

Oct-01-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वीट कॉर्न मसाला इडली कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मक्याचे कणीस
  2. 1 कप रवा
  3. 1 कप दही
  4. अर्धा कप मटार
  5. पाव कप मक्याचे दाणे
  6. तेल
  7. कढीपत्ता 10 ते 12 पाने
  8. 1 चमचा किसलेले आले
  9. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  10. 1 चमचा उडीद डाळ
  11. 1 चमचा चणा डाळ
  12. अर्धा चमचा मोहरी
  13. मीठ
  14. 1 चमचा इनो फ्रुट सॉल्ट

सूचना

  1. प्रथम मक्याचे कणीस किसून घ्या
  2. मग एका बाऊलमध्ये दही, रवा, मक्याचा किस घालून मिक्स करा
  3. मग त्यात मीठ, हिरव्या मिरच्या, आले घालून मिक्स करा
  4. मग एका तडका पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी घाला ती तडतडली की त्यात चणा डाळ व उडीद डाळ घालून गुलाबी रंगावर परता मग त्यात कढीपत्ता घालून तो परता व गॅस बंद करा ही फोडणी बाऊलमध्ये मिश्रणात घाला मिक्स करा
  5. मग त्यात मटारचे दाणे व मक्याचे दाणे घालून मिक्स करून घ्या व हे मिश्रण 10 मीनिट झाकून ठेवा
  6. मग इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा
  7. इडली च्या सच्याला तेल लावून घ्या
  8. मग बाउलमधील इडली मिश्रणात 1 चमचा इनो फ्रुट सॉल्ट मिक्स करून घ्या व हे मिश्रण इडली च्या साच्यात घालून नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या
  9. 20 मिनिटे इडली शिजवून घ्या
  10. पौष्टिक गरम गरम इडली हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर