Photo of Harabhara kabab by seema Nadkarni at BetterButter
473
2
0.0(1)
0

Harabhara kabab

Oct-01-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • मुघलाई
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 500 ग्राम पालक
  2. 2 कप शिजवलेले बटाटे
  3. 1/2 कप बारीक चिरलेली फरसबी
  4. 1 /2 मटार
  5. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 1-2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1 लिंबू चा रस
  9. 2 चमचा कोनफ्लोर
  10. चवी पुरते मीठ
  11. वर लावायला काजू
  12. तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. सवॅ प्रथम बटाटे उकडून घ्यावेत.
  2. पालक स्वच्छ धुवून, पाण्यात 5 मिनिटे शिजवून घ्यावे जास्त वेळ शिजवू नये. त्याचा रंग बदलतो.
  3. मटार, फरसबी पण शिजवून घ्यावे. पाणी काढून घ्यावे.
  4. शिजलेल्या पालक थंड करून पाणी काढून कोरडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  5. शिजलेल्या भाज्या पण मिक्सर मधुन वाटून घ्यावे.
  6. पेन मध्ये थोडे तेल घालून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात हिरव्या मिरच्या ची पेस्ट घालून परतून घ्यावे.
  7. आता त्यात वाटलेल्या भाज्या घालून एकत्र करावे. पालक ची पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, हळद, आमचूर पावडर घालून मिश्रण एकत्र करावे. सगळ फटाफट करावे जास्त वेळ परतू नये.
  8. गॅस बंद करून मिश्रण थंड करावे व त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे. व त्यात कोनफ्लोर घालून मळून घ्यावे.
  9. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.त्यावर काजू चे तूकडे लावून, कढईत तेल गरम करून त्यात तळून घ्यावे.
  10. जर तेलात तळायचे नसेल तर पेन मध्ये थोडे तेल घालून शेलो फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Feb-19-2019
Vidya Gurav   Feb-19-2019

Testi

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर