Photo of Cheese Chilli Toast by Sanika SN at BetterButter
1024
2
2.0(0)
0

Cheese Chilli Toast

Oct-01-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इटालियन
  • बेकिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५-६ ब्रेड स्लाईसेस (जास्त ही घेऊ शकता )
  2. १ छोटा कांदा बारीक चिरलेला
  3. २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. १ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली (कुठल्याही रंगाची घेऊ शकता )
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. किसलेले चीझ आवडीप्रमाणे
  7. १/२ टीस्पून काळीमिरीपूड
  8. १/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स 

सूचना

  1. साहित्य
  2. एका भांड्यात चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करुन घेणे. (मी मीठ वेगळे घातले नाही कारण चीझमध्ये मीठ असतं)
  3. ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण नीट लावून घ्यावे. त्यावर थोडी काळीमिरीपूड व ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.
  4. २०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाईस ठेवून ८-१० मिनिटे भाजवे. (ओव्हन नसल्यास तव्यावर किंवा ग्रील पॅनवर ही भाजु शकता.)
  5. टोस्ट तयार झाले की त्रिकोणी आकारात कापून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर