मुख्यपृष्ठ / पाककृती / मशरूम कोफ्ता करी

Photo of mushroom kofta curry by Triptila KS at BetterButter
659
1
0.0(0)
0

मशरूम कोफ्ता करी

Oct-03-2018
Triptila KS
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरूम कोफ्ता करी कृती बद्दल

मशरूममध्ये प्रोटीन खूप असतं . या रेसिपीत मशरूमचे कोफ्ते करून कांद्या टमाटरच्या ग्रेव्हीत घातलेले आहेत

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मशरूम 200ग्राम
  2. दोन मोठे कांदे
  3. टमाटर एक
  4. आलं एक इंच तुकडा
  5. लसूण चार कळ्या
  6. मीठ एक चमचा
  7. किचन किंग मसाला एक चमचा
  8. कोथंबीर ची पानं पाव वाटी
  9. हळद पावडर १/४ चमचा
  10. गरम मसाला अर्धा चमचा
  11. तेल तळण्यासाठी
  12. तांदळाचे पीठ एक वाटी

सूचना

  1. मशरूम चिरून घ्या आणि मीठ लावून दहा मिनिटं ठेवा
  2. त्यातलं पाणी काढून घ्या आणि हळद आणि किचन किंग मसाला लावून दहा मिनिटं ठेवा
  3. त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा ,कोथिंबिरीची पाने आणि तांदळाचे पीठ घालून त्याचे वडे करून घ्या आणि तव्यावर तेलात तळून घ्या
  4. एका पातेल्यात एक चमचाभर तेल घाला आणि त्यात आलं लसून परतून घ्या
  5. दोन मिनिटांनंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या
  6. कांदा झाल्यावर त्यात टमाटर परतून घ्या
  7. त्यात गरम मसाला घाला आणि थोडं पाणी घालून शिजु घ्या
  8. त्यात तळलेले मशरूमचे कोफता घाला आणी एक उकळी काढून घ्या
  9. चवीपुरत मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर