मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कडधान्याची कबाब

Photo of Mix sprouts kabab by seema Nadkarni at BetterButter
753
2
0.0(0)
0

मिक्स कडधान्याची कबाब

Oct-05-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कडधान्याची कबाब कृती बद्दल

प्रोटिन्स ने भरपूर

रेसपी टैग

  • एग फ्री
  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • हैद्राबादी
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप मिक्स sprouts
  2. 3-4 उकडलेले बटाटे
  3. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 1 टी स्पून लाल तिखट
  5. 1 टी स्पून हळद
  6. 1 टी स्पून चाट मसाला
  7. 1 टी स्पून गरम मसाला
  8. चवी पुरते मीठ
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 लिंबू चा
  11. 1-2 चमचा कोनफ्लोर
  12. 2 चमचा बेसन पीठ
  13. 2-3 चमचा ब्रेड क्रम्स

सूचना

  1. मुग, मटकी, चणे, चौळी, व बाकी चे कडधान्य भिजवून त्याना मोड आणून घ्यावे
  2. एका पातेल्यात पाणी घालून गरम होवू द्या, त्यात सगळे कडधान्य घालून एक ते दोन उकळी आली की गॅस बंद करावा व पाणी गाळून घ्यावे.
  3. एका बाउल मध्ये उकडलेले बटाटे व सवँ मसाले घालून एकत्र करावे.
  4. या मिश्रणात बेसन पीठ व कोनफ्लोर घालून एकत्र करावे.
  5. आता कडधान्य ला मिक्सर मधुन वाटून घ्यावे, बारीक नको भरड सारखे वाटावे. त्यात लसूण व हिरवी मिरची पण घालावी.
  6. बटाट्याचे मिश्रणात कडधान्य ची भरड घालून एकत्र करावे.
  7. या पीठा चे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  8. ब्रेड क्रम्स मध्ये फोल्ड करून पेन मध्ये थोडे तेल घालून शेलो फ्राय करून घ्यावे. किंवा तेलात तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर