मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाचंक्स खीमा पराठा

Photo of Soyachuncks Kheema Paratha by Manisha Lande at BetterButter
329
3
0.0(0)
0

सोयाचंक्स खीमा पराठा

Oct-06-2018
Manisha Lande
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाचंक्स खीमा पराठा कृती बद्दल

सोयाचंक्स खीमा पराठा खुपच टेस्टी पदार्थ आहे हे पुर्ण मिल म्हणजेच जेवण आहे कारण त्यात खीम्याचे सारण आहे त्यात सोयाचंक्स आहेत आणि त्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे खुप पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सारण साहित्य :
  2. २ वाटी सोयाचंक्स
  3. २ मोठे बारीक चिरलेले कांदे
  4. २ मोठे बारीक चिरलेले टोमॅटो
  5. १/४ वाटी फेटलेलं दही
  6. १ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  7. २ तमालपत्र
  8. २ लवंगा
  9. १ मोठा तुकडा दालचिनीचा
  10. १/४ छोटा चमचा बडीशेप
  11. १/२ छोटा चमचा जिरं
  12. १ मोठा चमचा लाल तिखट
  13. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  14. १ छोटा चमचा किचन किंग मसाला
  15. १/४ छोटा चमचा चाट मसाला
  16. १/४ छोटा चमचा हिंग
  17. चवीनुसार मीठ
  18. १/२ लिंबू रस
  19. १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  20. तेल
  21. वरील आवरण साहित्य:
  22. ३ वाटी गहु पीठ
  23. चवीनुसार मीठ
  24. तेल

सूचना

  1. प्रथम गव्हाची पोळी / चपाती ला जशी कणिक मळतो तशी मळुन घेतली व झाकून ठेवली.
  2. सोयाचंक्स १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत घातले.
  3. सोयाचंक्समधील पाणी काढून मिक्सरमधून बारीक दरदरीत वाटून घेतले.
  4. सोयाचंक्सच्या मिश्रणात फेटलेलं दही, १/२ छोटा चमचा लाल तिखट, व थोडं मीठ घालून ते अर्धा तासासाठी मॅरिनेट करुन ठेवले.
  5. गॅसवर कढई ठेवून त्यात २ मोठे चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, बडोशेप, लवंगा, जिरं, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी, बारीक चिरलेले कांदे, आलं-लसुण पेस्ट घालून कांदे छान सोनेरी रंगावर भाजून घेतले.
  6. नंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून परतले.
  7. नंतर त्यात मॅरिनेट केलेलं सोयाचंक्स च मिश्रण, लाल तिखट, किचन किंग मसाला, धने-जीरे पुड, चाट मसाला, चवीनुसार मीठ व थोडसं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेतले.
  8. सोयाचंक्स मिश्रणात १/२ लिंबू रस, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मध्यम आचेवर खीमा परतून थोडा कोरडा करून घेतला.
  9. मळलेल्या कणिकेचा गोळा करुन त्यात खीम्याचे सारण भरुन पोलपाटावर परोठे लाटून घेतले.
  10. गॅसवर तवा गरम करायला ठेवला, गरम झाल्यावर त्यावर थोडं बटर घालून त्यावर खीमा पराठा घालून बाजूंनी बटर लावून परोठे छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतला.
  11. गरमागरम "सोयाचंक्स खीमा पराठा" डिशमध्ये काढून दही व टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केला.
  12. "सोयाचंक्स खीमा पराठा" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर