मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कडधान्ये सॅलड

Photo of Mix sprouts salad by Shraddha Juwatkar at BetterButter
745
2
0.0(0)
0

मिक्स कडधान्ये सॅलड

Oct-06-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कडधान्ये सॅलड कृती बद्दल

मोड आणलेली कडधान्ये म्हणजे भरपूर प्रथिने. मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक छोटी वाटी हरबरे किंवा चणे
  2. एक छोटी वाटी हिरवे मूग
  3. पाव वाटी शेंगदाणे
  4. पाव वाटी मक्याचे दाणे
  5. एक कांदा बारीक चिरलेला
  6. आवडीप्रमाणे 1 हिरवी मिरची चिरून घ्यावी.
  7. एका लिंबाचा रस, मीठ, मीरपूड, साखर चवीनुसार
  8. चमचाभर चाट मसाला व थोडी कोथिंबीर.

सूचना

  1. सर्व कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजत घालावेत
  2. सकाळी पाणी उपसून कडधान्ये सुती कापडात बांधून मोड काढावेत.
  3. मोड आलेले कडधान्ये व मक्याचे दाणे कुकर मध्ये एक किंवा दोन शिट्ट्या काढून उकडून घ्यावेत.
  4. थंड झाल्यावर पाणी गाळून सर्व कडधान्ये एका बाऊल मध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मिरपूड लिंबाचा रस, साखर, मीठ, चाट मसाला घालून सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून सॅलड बनवावे. कोथिंबिरीने सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर