मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग दाल पालक

Photo of mung daal palak by supriya padave (krupa rane) at BetterButter
598
1
0.0(0)
0

मुग दाल पालक

Oct-08-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग दाल पालक कृती बद्दल

प्रोटीन ने भरपूर साधी सोपि रेसिपी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी मुग डाळ
  2. दोन वाटी बारीक चिरलेला पालक
  3. एक टोमेटो बारीक चिरून
  4. एक कांदा बारीक चिरुन
  5. सात ते आठ कड़ी पत्ता पाने
  6. एक हिरवी मिरची बारीक चिरुन
  7. एक चमचा आले लसुन पेस्ट
  8. एक चमचा जीरे
  9. एक चमचा लाल तिखट
  10. एक चमचा धने जीरे पूड
  11. अर्धा चमचा गरम मसाला
  12. दोन चमचे बटर
  13. अर्धा चमचा हळद
  14. 8 ते 10 मेथी दाने
  15. पाव चमचा हींग
  16. मीठ
  17. चार चमचे तेल

सूचना

  1. मुग डाळ स्वछ धुवून 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवा नंतर कुकर मधे ठेवून3 शिटया देवून शिजवून घ्या
  2. तेल तापत ठेवा आता हयात जीरे मेथी दाने मिर्ची कदीपता याची फोडनि करून घ्या
  3. आता हयात कांदा व् आले लसुन पेस्ट टाका व् चांगले परतून घ्या
  4. आता हयात टोमेटो लाल तिखट धने जीरे पूड व् गरम मसाला टाका व् पाच मिनिट शिजू द्या
  5. नंतर हयात चिरलेला पालक टाका व् पाँच ते सात मिनिट परतवा ,पालक वाफेने मऊ शिजला जाइल
  6. आता हयात शिजलेली मुग डाल व् मिठ टाका व् 10 मिनिट शिज्जु दया
  7. शेवटी बटर व् कोथिम्बीर टाका
  8. ही डाळ अत्यंत पौष्टिक आहे आपण चपाती व् भाता बरोबर खावू शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर