मुख्यपृष्ठ / पाककृती / ढाबा स्टाईल चिकन कलेजी मसाला

Photo of Dhaba Style Chicken Kaleji Masala by Manisha Lande at BetterButter
2985
2
0.0(0)
0

ढाबा स्टाईल चिकन कलेजी मसाला

Oct-08-2018
Manisha Lande
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढाबा स्टाईल चिकन कलेजी मसाला कृती बद्दल

चिकन कलेजी मसाला खुपच चविष्ट आणि चमचमीत डिश आहे आणि सोपी डिश आहे, आणि त्यात प्रोटीन्सचे प्रमाण २५.८% इतके असते त्यामुळे साहजिकच आपल्यासाठी खुप पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ किलो चिकन कलेजी
  2. १ मोठा बारीक चिरलेला कांदा
  3. १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2 मोठे चमचे आलं-लसुण पेस्ट
  5. १ मोठा चमचा आपल्या घरी बनविलेला लाल मिक्स मसाला
  6. १/२ मोठा चमचा लाल तिखट
  7. १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. १/२ लिंबू रस
  9. चवीनुसार मीठ
  10. तेल

सूचना

  1. मिक्सरमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं-लसुण पेस्ट, घरचा मिक्स मसाला, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बारीक पेस्ट वाटून घेतली.
  2. कलेजी ३ ते ४ वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली.
  3. नंतर वाटलेला मसाला कलेजीला व्यवस्थित चोळून लावुन घेतला.
  4. कढईत तेल गरम करत ठेवले तेल तापल्यावर त्यात मसाला लावलेली कलेजी व सर्व मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला.
  5. नंतर त्यात लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून सर्व छान एकजीव करून घेतलं.
  6. चिकन कलेजी मसाला मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे छान शिजवून घेतला.
  7. तयार कलेजी मसाला सर्व्हींग डिशमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरुन गरमागरम सर्व्ह केलं.
  8. गरमागरम "ढाबा स्टाईल चिकन कलेजी मसाला" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर