मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक सोयाबीन आप्पे

Photo of SOYABIN APPE by Samiksha Mahadik at BetterButter
501
2
0.0(0)
0

पौष्टिक सोयाबीन आप्पे

Oct-08-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक सोयाबीन आप्पे कृती बद्दल

अतिशय पौष्टिक असे सोयाबीन चे अप्पे करायला एकदम सोप्पे आणि खायलाही चविष्ट..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सोयाबीन
  2. प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी आणि सिमला मिरची
  3. 1 गाजर किसलेला
  4. 1 बटाटा उकडून किसलेला
  5. 1 कांदा बारीक चिरलेला
  6. 2 चमचे बेसन
  7. 2 चमचे रवा
  8. 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  9. 1 चमचा लाल तिखट
  10. अर्धा चमचा हळद
  11. 1 चमचा धानेजिरे पूड
  12. मीठ
  13. 1 चमचा तेल
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. तेल फ्राय करण्यासाठी
  16. अप्पे पात्र

सूचना

  1. प्रथम सोयाबीन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा
  2. मग त्यातले पाणी हाताने पिळून काढा
  3. म सोयाबीन मिक्सरमध्ये वाटून घ्या
  4. मग त्यात सिमला मिरची, गाजर, कोबी कांदा, बटाटा घालून मिक्स करून घ्या
  5. मग त्यात बेसन, रवा, आलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट, तिखट, हळद, धानेजिरे पूड, मीठ, कोथिंबीर, 1 चमचा तेल घालून छान मिक्स करून घ्या
  6. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या
  7. अप्पे पात्रात तेल करायला ठेवा
  8. मग त्यात अप्पे घालून झाकण ठेवून शिजवून घ्या
  9. मग थोड्या वेळाने अप्पे पालटून घ्या
  10. दोन्ही बाजूने तेल सोडून अप्पे छान खरपूस भाजून घ्या मग
  11. गरमागरम पौष्टिक सोयाबीन अप्पे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर