मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत अंड्यांचे चविष्ट कालवण

Photo of Spicy Egg Curry by Shraddha Juwatkar at BetterButter
783
2
0.0(0)
0

झणझणीत अंड्यांचे चविष्ट कालवण

Oct-09-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत अंड्यांचे चविष्ट कालवण कृती बद्दल

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ अंडी
  2. १ मोठा कांदा (उभा चिरून) + १/२ कप सुकं खोबरं + १ टीस्पून कांदा-लसूण मसाला
  3. ३ टेबलस्पून कांदा बारीक चिरून
  4. १ टीस्पून आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट
  5. १टोमॅटो चिरून
  6. १ १/४ टीस्पून लाल तिखट
  7. आवश्यकतेनुसार तेल

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा घालून लालसर रंगावर भाजून घ्यावा.नंतर एका ताटात काढुन घेणे.
  2. त्याच कढईत सुके खोबरे खमंग भाजून घ्यावे व कांदा लसूण मसाला घालून ढवळावे. वाटण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
  3. एकीकडे अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. थंड झाल्यावर एका अंड्यांचे दोन भाग करावे.
  4. आता एका पातेल्यात थोडे जास्तीचे तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून  घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूणमिरची पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
  5. त्यात वाटलेला मसाला घालून परता.लागेल तसे पाणी घालून हवे तितके पातळ करा.
  6. उकडलेली अंडी करी मध्ये सोडा व झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या.तेल वरती तरंगायला लागले की गॅस बंद करावा.
  7. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर