BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / होल व्हीट फ्लावर पॅन पिझ्झा

Photo of Whole Wheat Flour Pan Pizza by Manisha Lande at BetterButter
0
1
0(0)
0

होल व्हीट फ्लावर पॅन पिझ्झा

Oct-09-2018
Manisha Lande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

होल व्हीट फ्लावर पॅन पिझ्झा कृती बद्दल

सर्वांना आवडणारा पिझ्झा हेल्दी स्वरूपात. या पदार्थात मी मैदा बिलकुल वापरला नाही.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. १ वाटी गहु पीठ
 2. १/२ मोठा चमचा अमुल बटर
 3. १ मध्यम आकाराचा कांदा
 4. १ मध्यम आकाराचा टोमॅटो
 5. १ मध्यम आकाराची शिमला मिरची
 6. १/२ वाटी उकडलेले मक्याचे दाणे
 7. १ मोठा चमचा टोमॅटो सॉस
 8. १ वाटी प्रोसेस चीज
 9. तेल

सूचना

 1. प्रथम गहू पीठात थोडं तेल व पाणी घालुन चपाती / पोळी साठी मळतो तशी कणिक मळुन बाजूला ठेवली.
 2. सर्व भाज्या पाणयाखाली स्वच्छ धुवून घेतलया.
 3. कांदा, शिमला मिरची, टोमॅटोचे पातळ उभे ज्युलियन्स ( काप / तुकडे ) करून घेतले.
 4. मळलेल्या कणिकेचा गोळा करुन पोलपाटावर त्याची जाडसर लांब पोळी लाटून त्यावर फोर्क ने टोचे मारून पिझ्झा बेस केला.
 5. गॅसवर तवा गरम करायला ठेवला व त्यावर थोडं बटर घालून त्यावर पिझ्झा बेस दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतला.
 6. नंतर भाजलेला पिझ्झा बेस फ्लॅट सरफेसवर ठेवून त्यावर थोडं बटर पसरवून लावलं.
 7. नंतर त्या बेसवर टोमॅटो सॉस पसरवून लावुन वरुन किसलेलं चीज पसरवून घातलं.
 8. नंतर त्या बेसवर कांदा, शिमला मिरची, व टोमॅटो चे उभे कापलेले ज्युलियन्स, व उकडलेले मक्याचे दाणे पसरवून घातले.
 9. शेवटी पुन्हा एकदा वरून भरपूर किसलेलं चीज पसरवून पिझ्झा तयार करुन घेतला.
 10. गॅसवर तवा गरम करून त्यावर तयार पिझ्झा ठेवून झाकण ठेवून मंद आचेवर छान भाजून घेतला.
 11. तयार पिझ्झा सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून शिमला मिरचीचे ज्युलियन्स लावून पिझ्झा सर्व्ह केला.
 12. "होल व्हीट फ्लावर पॅन पिझ्झा" रेडी टू ईट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर