BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग -उडद मेदू वडा आणि चटणी

Photo of Moong-Udad Dal Meduwada with chutney by Shruti Brown at BetterButter
1
2
0(0)
0

मूग -उडद मेदू वडा आणि चटणी

Oct-09-2018
Shruti Brown
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग -उडद मेदू वडा आणि चटणी कृती बद्दल

मेदूवडा हा पारंपरिकरीत्या उडद डाळीपासूनच बनवला जातो . पण मी जेव्हा हा वडा बनवते तेव्हा आठवणीने त्यात मुगाची डाळ हमखास घालते उडद डाळ हि पौष्टिक आहेच पण मुगाच्या डाळीमुळे या मेदूवड्याला खूपच मस्त स्वाद येतो . आणि मूग डाळ हि पचायला फार हलकी असते त्यामुळे उडद डाळीमुळे पोटाला होणारा अपचनाचा त्रास सुद्धा कमी होतो

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • साऊथ इंडियन
 • फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. वड्यासाठी २ वाटी उडद डाळ
 2. १/२ वाटी मुग डाळ
 3. १ इंच आलं
 4. ६-८ हिरवी मिरची
 5. ७-८ पाकळ्या लसूण
 6. चवीप्रमाणे मीठ
 7. चटणीसाठी १ वाटी ओलं खोबरं
 8. १-४ वाटी भाजलेले शेंगदाणे
 9. ४-५ लसुण
 10. ४-५ हिरवी मिरची
 11. १/४ वाटी कोथिंबीर
 12. १/२ लिंबाचा रस
 13. चवीप्रमाणे मीठ

सूचना

 1. उडद आणि मूग डाळ स्वछ धुवून ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवावी
 2. भिजलेली डाळ पाणी न घालता घट्ट वाटून घ्यावी
 3. आलं , लसूण आणि मिरची सुद्धा थोडी जाडसर वाटून वाटलेल्या डाळीत घालून चवीनुसार मीठ घालावे
 4. आवडत असल्यास या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालावा
 5. कढईमधे तेल गरम करून घ्यावे
 6. हाताला पाणी लावून एका पिशवीवर वडा थापून घेऊन तो अलगद ओल्या हातानेच उचलून तेलात सोडावा
 7. मध्यम आचेवर वडे तेलात सोडून खमंग तळून घ्यावे
 8. चटणीसाठी घेतलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे चटणी तयार
 9. वाटलेली चटणी
 10. गरमा गरम वडे चटणीसोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर