Photo of Multi grain pancakes by Shraddha Sunil Desai at BetterButter
890
5
0.0(1)
0

Multi grain pancakes

Oct-11-2018
Shraddha Sunil Desai
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 200 ग्रॅम गहू
  2. २०० ग्रॅम तांदूळ
  3. २०० ग्रॅम ज्वारी
  4. 100 ग्राम साबुदाणे
  5. १०० ग्राम उडद डाळ
  6. १०० ग्राम चणा डाळ
  7. १०० ग्राम मूग डाळ
  8. १०० ग्राम मसूर डाळ
  9. १०० ग्राम पोहे
  10. ५० ग्राम धणे
  11. २५ ग्राम बडीशेप
  12. २५ ग्राम जिरे
  13. थालीपीठ बनवण्यासाठी २ वाटी भाजणी पीठ
  14. 1 बारीक चिरलेला कांदा
  15. बारीक चिरलेली हिरवी मिरची 2
  16. बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी
  17. चवीनुसार लाल तिखट
  18. चवीनुसार किचन किंग मसाला
  19. चवीनुसार मीठ
  20. १ चमचा आलं लसूण पेस्ट
  21. १ चमचा पांढरे तीळ थालीपीठ वर लावण्यासाठी

सूचना

  1. भाजणी बनवण्यासाठी घेतलेले सर्व साहित्य ५ मिनिटं कढईत मंद आचेवर एक एक करून भाजून घ्यावी
  2. भाजणी
  3. सर्व भाजणी थंड झाली कि गिरणीतून त्याचे पीठ दळून आणावे आणि हे पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवावे
  4. हे पीठ ३-४ महिने अगदी व्यवस्थित खराब न होता राहते .जेव्हा पाहिजे तेव्हा आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात भाज्या मसाले घालून थालीपीठ बनवता येते
  5. थालीपीठ बनवताना त्यात लाल तिखट , हिरवी मिरची तुकडे , मीठ , किचन किंग मसाला , आलं लसूण पेस्ट चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून एकजीव करून तेल लावून मळून घ्यावे
  6. मळलेले पीठ
  7. आता या पिठाचे मध्यम गोळे करून ते हाताने थापून त्यावर चवीसाठी पांढरे तीळ टाकून पुन्हा एकदा थापून ते उचलून अलगद गरम तव्यावर थोड्या तेलावर सोडावे
  8. थालिपीठ थापताना त्याला मध्ये ३-४ छिद्र बोटाने करावी त्यामुळे ती व्यवस्थित शिजतात
  9. दोन्ही बाजूनी शेकवून घेऊन गरमा गरम थालीपीठ दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करावी
  10. थालीपीठ शक्यतो गरम तव्यावरच थापली जातात पण ज्यांना तसं करणं जमत नसेल त्यांनी फोटोत दाखवल्याप्रमाणे एखाद्या पिशवीवर किंवा पातळ कपड्यावर थापावी .
  11. गरमा गरम पौष्टिक भाजणीचं थालीपीठ खायला तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shruti Brown
Oct-14-2018
Shruti Brown   Oct-14-2018

Its really Healthy n Tempting dish.:thumbsup::ok_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर