मुख्यपृष्ठ / पाककृती / पम्पकिन पिलो:jack_o_lantern:Pumpkins Pillows

Photo of Pumpkin Pillows by Archana Lokhande at BetterButter
349
3
0.0(0)
0

पम्पकिन पिलो:jack_o_lantern:Pumpkins Pillows

Oct-11-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पम्पकिन पिलो:jack_o_lantern:Pumpkins Pillows कृती बद्दल

पम्पकिन पिलो म्हणजेच लाल भोपळ्याच गोड सांदणं..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी इडली रवा
  2. १ वाटी लाल भोपळ्याचा किस
  3. १/२ वाटी साखर
  4. १/२ वाटी गुळ(गुळ आणि साखय दोन्ही मिळून एक वाटी)
  5. १/२ वाटी दुध
  6. २ चमचे दही
  7. ४ चमचे साजूक तूप
  8. १/४ चमचा दालचिनी पावडर
  9. १ चिमूट मीठ
  10. २ चिमूट बेकिंग पावडर

सूचना

  1. प्रथम एक चमचा तुप कढईत गरम करून रवा थोडा भाजून बाजूला काढून ठेवला.
  2. त्याच कढईत एक चमचा तुप गरम करून भोपळ्याचा किस,गुळ आणि मीठ घालून पाच मिनिटे शिजवून घेतला.
  3. नंतर पाव चमचा दालचिनी पावडर घालून मिक्स करून घेतले.
  4. आणि गँस बंद करून मिश्रण खाली उतरून घेतले.
  5. नंतर दुध आणि साखर घालून मिक्स करून थंड करून घेतले.
  6. आता मिक्सरवर खाली एक चमचा तुप आणि थंड झालेले मिश्रण घालून वाटून घेतले.
  7. त्यातच भाजलेला रवा आणि दही घालून पुन्हा वाटून घेतले.
  8. मिश्रण इडलीच्या पिठाप्रमाणे सरभरीत झाल्यावर झाकण ठेवून वीस मिनिटे ठेवून दिले.
  9. वीस मिनीटांनी मिश्रण फुलून येते.
  10. आता त्यात एक ते दोन चमचे दुध किंवा दही आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करून घेतले.
  11. तुप लावलेल्या इडली पात्रातून दहा मिनिटे वाफलून घेतले.
  12. तयार झाले पम्पकिन पिलो...सोबतीला नारळाचे दुध आणि तुप अत्यावश्यक...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर