476
1
2.0(0)
0

Sweet corn sugar free ladoo

Oct-11-2018
Priyanka Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • राजस्थान
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1१ वाटी स्वीट कॉर्न चे वाळवलेले दाणे.
  2. दीड वाटी गव्हाचे पीठ. ( कमी जास्त लागेल तस वाढवू किंवा कमी करू शकतो )
  3. तूप साधारण १ वाटी
  4. १ चमचा वेलची पूड
  5. साधारण १ वाटी दूध...( कमी जास्त करू शकतो).
  6. २ चमचे मध.
  7. २ चमचे डिंक.

सूचना

  1. प्रथम मक्याचे दाणे मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्यावे.
  2. नंतर ते थंड होऊ देणे
  3. नंतर ते मिक्सर मधुन एकदम बारीक पीठ करून घेणे.
  4. मक्याचे हे पीठ एका मोठ्या ताटात काढून घेणे.
  5. त्यामध्ये मध घालणे
  6. नंतर गव्हाचे पीठ घालणे.
  7. नंतर दूध घालणे.
  8. आणि चांगले एकसारखे मळून १/२ तास भिजत ठेवणे.
  9. नंतर या वरील मिश्रणाचे छोट्या आकाराचे पोळ्या लाटून घेणे.
  10. गॅस मंद करून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घेणे.
  11. नंतर ही पोळी गार झाल्यावर मिक्सर मधून एकदम बारीक करून घेणे.
  12. नंतर त्यात डिंक तुपात तळून बारीक करून घालणे.
  13. नंतर त्याचे लाडू वळता येतील असे तूप घालणे.
  14. वरील मिश्रणाचे हवे त्या आकाराचे लाडू वळणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर