मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया शामी कबाब

Photo of soya shaami kabab by supriya padave (krupa rane) at BetterButter
703
3
0.0(0)
0

सोया शामी कबाब

Oct-12-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया शामी कबाब कृती बद्दल

ह्या मधे सोयाबीन व् पनीर चा वापर केला आहे त्यामुळे यात प्रोटीन चे प्रमाण मुबलक आहे व् चविला सुद्धा छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • हैद्राबादी
  • शॅलो  फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी सोया वड़ी
  2. पाव वाटी पनीर
  3. एक छोटा कांदा
  4. दोन हिरवी मिरची पेस्ट करुन
  5. एक चमचा आले लसुन पेस्ट
  6. चार मोठे चमचे बेसन
  7. अर्धा वाटि कोथिम्बीर
  8. एक चमचा लाल तिखट
  9. एक चमचा मिरी पूड
  10. अर्धा चमचा धने जीरे पूड
  11. अर्धा चमचा चाट मसाला
  12. मीठ
  13. तेल
  14. अर्धा लिम्बाचा रस

सूचना

  1. सोयाबीन ऊकळत्या पाण्यात टाकून दहा मिनिट शिजू द्या
  2. सोयबिन शिजून साइज मधे डबल ज़ाले असतिल आता ह्यातले सर्व पाणी निथलुन टाका सोयाबीन मधे अजिबात पाणी रहाता कामा नये
  3. बेसन कोरडेच गुलाबी रंगावर भाजुन घ्या
  4. कांदा कोथिम्बीर बारीक चिरून घ्या मिर्ची पेस्ट बनवून घ्या
  5. आता सोयाबीन मिक्सर मधुन जाड्सर वाटून घ्या पाणी अजिबात वापरु नका
  6. सोयाबीन चा चूरा कांदा कोथिम्बीर मीठ एक चमचा तेल व् पनीर लिबू रस आणि सर्व सुके मसाले भाजलेले बेसन सर्व एकत्र करुन त्याचा गोळा करुन घ्या
  7. जर मिश्रण नीट मिळून येत नसेल तर बेसन चे प्रमाण वाढवा किंवा कॉर्नफ्लोर वापरले त्तरी चालेल
  8. आता ह्या मिश्रण चे लांबट गोळे करुन घ्या म्हणजे ते कबाब प्रमाणे दिसतील
  9. आता तेल तापत ठेवा व् कबाब शैलो फ्राई करुन घ्या सर्व बाजूने परतून सोनेरी रंगावर तळून घ्या
  10. सलाड किंवा सॉस बरोबर serve करा
  11. हे कबाब nonveg सारखेच लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर