मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही सोया मसाला

Photo of Shahi Soya Masala by Renu Chandratre at BetterButter
799
5
0.0(0)
0

शाही सोया मसाला

Oct-12-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही सोया मसाला कृती बद्दल

सोयाचंक्स ची शाही मसालेदार करी, काजू बदाम आणि टोमॅटो च्या रिच ग्रेव्ही मध्ये शिजलेली ही भाजी आवश्यक प्रथिनांनी , व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स नी परिपूर्ण आहे। पोळी , पराठा, नान, ब्रेड किंवा रोटी सोबत अप्रतिम लागते। सोया ची भाजी असल्यामुळे नॉन व्हेजिटेरिअन लोकांना पण ही भाजी खूप आवडते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • स्टर फ्रायिंग
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सोयाचंक्स 2 वाटी
  2. शिमला मिरची चे मोठे तुकडे 1 वाटी
  3. टोमॅटो बारीक चिरलेला 2
  4. कांदा बारीक चिरलेला 1
  5. दही 1 वाटी
  6. हळद 1/2 चमचा
  7. लाल तिखट 1 ते 2 चमचे
  8. कसुरी मेथी 1 चमचा
  9. धणे पूड 1 चमचा
  10. गरम मसाला 1 चमचा
  11. काजू 1 मोठा चमचा
  12. बदाम 1 मोठा चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल 2 मोठे चमचे
  15. क्रीम 2 ते 4 चमचे
  16. लसूण पाकळ्या 8 ते 10
  17. अदरक चे तुकडे 1 चमचा
  18. लवंग 4 ते 5

सूचना

  1. सर्वप्रथम सोयाचंक्स स्वच्छ पाण्याने धुऊन , गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा
  2. एका भांड्यात दही , हळद, तिखट, गरम मसाला, धणे पूड, कसूरी मेथी, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे
  3. भिजलेले सोयाचंक्स हाताने दाबून पिळून घ्यावे आणि जास्तीचे पाणी काढून टाकावे। दह्याच्या मिश्रणात मॅरीनेट करून 10 ते 15 मिनिटे फ्रिज मधे ठेवावे।
  4. शिमला मिरची चे मोठे तुकडे करावेत
  5. कढईत 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करा। त्यात कांदा ,लसूण, अदरक, काजू आणि बदाम खरपूस भाजून घ्यावे
  6. टोमॅटो पण घाला आणि मऊहोईपर्यंत शिजवून घ्यावे
  7. थोडे काजू आणि बदाम शेवटी सजावटी साठी काढून घ्यावे
  8. भाजलेला कांदा, टोमॅटो ,आले, लसूण आणि काजु बदाम मिक्सर जार मधे घ्यावेत
  9. आणि बारीक पेस्ट करून घ्यावा
  10. त्याच कढईत अजून थोडे तेल घालून , मॅरीनेट केलेला सोयाचंक्स घ्या
  11. सुकेपर्यंत मंद आचेवर परतून घ्या
  12. शिमला मिरची चे तुकडे पण परतून घ्यावे
  13. तयार पेस्ट घाला
  14. थोडे पाणी, मीठ, क्रीम घालून व्यवस्थित मिक्स करावे
  15. झाकून मंद आचेवर 5 ते 10 मिनीटे शिजवावे
  16. शाही सोया मसाला तयार आहे । तळलेले काजू बदाम आणि कोथिंबीर नि सजवून घ्या
  17. गरमागरम शाही सोया मसाला पोळी, पराठा, नान, ब्रेड किंवा रोटी बरोबर सर्व्ह करावे । एन्जॉय ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर