Photo of Mutter Paneer by Shraddha Juwatkar at BetterButter
705
3
0.0(0)
0

मटार पनीर

Oct-12-2018
Shraddha Juwatkar
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पनीर कृती बद्दल

शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. हिरव्या मटारमध्ये उच्च फायबर आणि प्रोटीन असल्याने त्याचा वापर आपल्या आहारात केला पाहिजे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 250 ग्राम पनीर
  2. 2 वाट्या हिरवे मटार
  3. 2 मोठे उभे चिरलेले कांदे
  4. 2 उभे चिरलेले टोमॅटो
  5. 5/6 लसूण पाकळ्या 1 इंच आले 1 उभी चिरलेली हिरवी मिरची
  6. 8/10 काजू चे टुकडे
  7. 1 टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर
  8. 1 टीस्पून हळद
  9. 1 टेबलस्पून धने जिरे पूड
  10. 1 टीस्पून गरम मसाला पावडर
  11. 1 टेबलस्पून किचन किंग मसाला
  12. 1 टेबलस्पून दही
  13. चवीनुसार मीठ
  14. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करून  घ्या त्यात कांदे चांगले परतून घ्या. नंतर त्यात आले लसूण, हिरवी मिरची व टोमॅटो घालून व्यवस्थित टोमॅटो शिजे पर्यंत परतावे.गॅस बंद करून मिश्रण थंड करण्यास बाजूला ठेवावे.
  2. पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.
  3. वरील मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
  4. पुन्हा कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालावे. जिरे तडतडले की वाटलेली पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. त्यात लाल तिखट, धने जिरे पूड घालून वाटणाला तेल सुटेपर्यंत सारखे परतून घ्यावे.
  5. आता त्यात हिरवे मटार घालून चांगले परतून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून हवे तितके पातळ करावे व झाकण ठेवून दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे.
  6. नंतर त्यात पनीर व दही, चवीनुसार मीठ व गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी व गॅस बंद करून कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर