मुख्यपृष्ठ / पाककृती / ढाबा स्टाईल छोले / चना मसाला

Photo of Dhaba Style Chole / Chana Masala by Manisha Lande at BetterButter
635
3
0.0(0)
0

ढाबा स्टाईल छोले / चना मसाला

Oct-12-2018
Manisha Lande
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढाबा स्टाईल छोले / चना मसाला कृती बद्दल

चविष्ट, पौष्टिक आणि सोपा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी काबुली चणे / छोले
  2. १ मोठा बारीक चिरलेला कांदा
  3. १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  4. २ मोठे चमचे बेसन
  5. १ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  6. १ मोठा चमचा लाल तिखट
  7. १/२ छोटा चमचा हळद
  8. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  9. १ छोटा चमचा किचन किंग मसाला
  10. १/2 छोटा चमचा कश्मिरी लाल तिखट
  11. चवीनुसार मीठ
  12. तेल
  13. गरम पाणी
  14. १/२ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम काबुली चणे / छोले ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवले.
  2. नंतर त्यातलं पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये छोले बुडतील इतके पाणी घालुन त्यात छोले व चिमूटभर मीठ घालून ७ ते ८ शिटट्या काढून छोले शिजवून घेतले.
  3. कढई गॅसवर ठेवून त्यात बेसन घालून ते कोरडंच सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतले व बाजूला ठेवले.
  4. त्याच कढईत तेल घालुन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा,आलं-लसुण पेस्ट घालून छान सोनेरी रंगावर भाजून घेतला.
  5. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत व त्याचा कच्चट वास जाईपर्यंत परतून घेतला.
  6. नंतर त्यात भाजलेले बेसन घालून ते कांद्याच्या मिश्रणाबरोबर एकजीव करून घेतले.
  7. नंतर त्यात लाल तिखट, हळद, धने-जीरे पुड, किचन किंग मसाला, कश्मिरी लाल तिखट घालून सर्व मिश्रण व भसाले छान एकजीव करून घेतले.
  8. नंतर त्यात वाफवलेले छोले घालून परतले.
  9. नंतर त्यात ग्रेव्ही जितकी पातळ हवी तितकं छोले शिजवताना वापरलेलं गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर शिजवून एक उकळी येईपर्यंत शिजवून घेतले.
  10. नंतर तयार छोले / चना मसाला सर्व्हींग बावुलमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह केलं.
  11. "ढाबा स्टाईल छोले / चना मसाला" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर