मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर बेसन चीला

Photo of Paneer Besan Cheela by Shraddha Juwatkar at BetterButter
669
3
0.0(0)
0

पनीर बेसन चीला

Oct-12-2018
Shraddha Juwatkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर बेसन चीला कृती बद्दल

100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते.नेहमी आपण बेसनचा पोळा करतो पण पनीर घालून केलेला पोळा खूपच चवीष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप बेसन
  2. 1 टेबलस्पून तांदुळाचे पीठ
  3. 1 मध्यम कांदा, सिमला मिरची व टोमेटो बारीक चिरून
  4. 100 ग्राम किसलेले पनीर
  5. 1 टीस्पून किसलेले आले
  6. आवश्यकतेनुसार हळद, लाल तिखट, काळीमिरी पावडर, ओवा व मीठ
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. तेल

सूचना

  1. प्रथम एका बाऊल मध्ये बेसन पीठ तांदुळाचे पीठ, कांदा टोमॅटो सिमला मिरची पनीर व सर्व मसाले एकत्र करून घेणे.
  2. आता त्यात किसलेले आले चवीनुसार मीठ व पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण जास्त घट्टा किवा जास्त पातळ करू नये. पाच मिनिटे झाकून ठेवावे.
  3. नंतर गॅस वर पसरट तवा ठेऊन त्यात थोडे तेल घालून, त्यात मिश्रण टाकून पसरवणे आणि गॅस मध्यम आचेवर करणे. 
  4. 2/3 मिनिटांनी पलीत्याने पोळा परतणे. असे दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घेणे.
  5. चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर