मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक भाजी भाकरी ट्रँगल

Photo of HEALTHY traingles by Aditi Bhave at BetterButter
580
1
0.0(0)
0

पौष्टिक भाजी भाकरी ट्रँगल

Oct-12-2018
Aditi Bhave
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक भाजी भाकरी ट्रँगल कृती बद्दल

अंबाडीची भाजी , मिश्र पौष्टिक पिठाची भाकरी, पोषण मूल्य वाले चीज, शेंगदाणा चटणी , बटर घालून केलेले कुरकुरीत भाजी भाकरी ट्रँगल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आंबडी ची जुडी-1
  2. तुरीची डाळ - अर्धी वाटी
  3. तांदूळ कणी -अर्धी वाटी
  4. शेंगदाणा - अर्धी वाटी
  5. सुकी मिरची - 2,3
  6. हळद, हिंग , मोहरी - फोडणीसाठी
  7. तेल - 3,4 चमचे
  8. मीठ - चवीनुसार
  9. लसूण - 3,4 पाकळ्या
  10. गूळ - 1 बारीक खडा
  11. भाकरीसाठी-
  12. मिश्र पीठ- 2 वाट्या( उडीद, ज्वारी, तांदूळ, नाचणी)
  13. मिठ चवीनुसार
  14. शेंगदाणा चटणी साठी-
  15. भाजलेले शेंगदाणे- 1 वाटी
  16. जिरे- 1 चमचा
  17. मीठ - चवीनुसार
  18. साखर- चवीनुसार
  19. आंबा पावडर - चिमूटभर

सूचना

  1. साहित्य
  2. अंबाडीची भाजी धुवून , चिरून घ्यावी. उकडवावी.
  3. आंबट नको असेल तर पाणी काढून टाकावे.
  4. तूरडाळ, कण्या शिजवून घ्याव्यात. सर्व एकत्र करावे.
  5. एका पातेल्यात फोडणी करावी . मिरची, लसूण, शेंगदाणे त्यात तळून घ्यावे.
  6. मग शिजलेली भाजी, डाळ, कण्या सर्व घोटून घालावे. गूळ, मिठ घालावे.
  7. छान वाफ काढावी.
  8. भाजी तयार.
  9. शेंगदाणे भाजून साल काढुन घ्यावे. त्यात मीठ , तिखट, साखर, आंबा पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. चटणी तयार.
  10. आता भाकरी पीठात मीठ व गरम पाणी घालून मळावे. त्याची भाकरी करावी.
  11. भाकरीचे त्रिकोणी तुकडे करावेत.
  12. प्रत्येक तुकड्यावर अंबाडीची भाजी पसरवून घ्यावी.
  13. चीज किसून घालावे. शेंगदाणा चटणी पसरवावी.
  14. गरम तव्यावर लोणी सोडून हे ट्रँगल छान भाजून घ्यावेत.
  15. पारंपरिक डिश ला जरा हटके करण्याचा प्रयत्न केला. आणि तो सर्वांना आवडला.
  16. पालेभाज्या खाताना मुले कंटाळा करतात, ह्याप्रमाणे वेगळे काहीतरी केले की अपोआप खाल्ली जाते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर